एका महिलेवर जीवघेणा हल्ला; एक महिलेचा हुंड्यासाठी छळ

नरसी चौकातील लक्झरी बस थांब्यावर एका महिलेवर चाकूने जीवघेणा हल्ला झाला आहे. तसेच एका 23 वर्षीय विवाहितेला सासरच्या मंडळीने त्रास दिला आहे.

खंडगाव बेंद्री ता.नायगाव, ह.मु.नांदेड येथील सुनिता शिवाजी काटेवाड(48) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार 12 मार्च 2019 रोजी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास त्या बेंद्री येथील कंदोरीचा कार्यक्रम संपवून नरसी चौकातील लक्झरी स्टॅंडवरून नांदेडकडे येण्यासाठी लक्झरीत बसल्या असतांना एकाने त्यांना लक्झरीतून उतर आणि माझ्यासोबत मोटारसायकलवर चल असे सांगितले. सुनिता काटेवाड यांनी नकार देताच त्या आरोपीने त्यांचा हात धरुन बसखाली ओढले आणि त्यांच्यापोटात चाकूने हल्ला करून जखमी केले. रामतिर्थ पोलीसांनी जीव घेणा हल्ला करणाऱ्याविरुध्द गुन्हा दाखल केला असून पोलीस उपनिरिक्षक एस.एस.बनसोडे अधिक तपास करीत आहेत.

एका 23 वर्षीय विवाहित महिलेने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार डिसेंबर 2018 ते मार्च 2019 या दरम्यान त्या महिलेला तिचे सासरची मंडळी तु दिसायला चांगली नाही आणि तुला या घरात नांदायचे असेल तर माहेरहून 1 लाख रुपये घेऊन ये असे सांगून तिला मारहाण केली, शिवीगाळ केली, मानसिक व शारिरीक त्रास दिला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस नाईक जमदाडे अधिक तपास करीत आहेत.

You may also like