नायगावमध्ये 2 क्विंटल प्लास्टिक जप्त; 66 हजाराचा दंड

प्लास्टिकच्या वापराने पर्यावरणाला धोका असल्यामुळे शासनाने प्लास्टिक बंदी केली असली तरी व्यापारी सर्रास कॅंरिबॅंगाचा वापर करीत असल्याने. नायगाव नगरपंचायतच्या मुख्याधिकाऱ्यांनी गरुवारी शहरात प्लास्टिक विरोधी धडक मोहीम राबवून दोन क्विंटल प्लास्टिक जप्त करण्यात आले तर 66 हजाराचा दंड आकारण्यात आला असल्याची माहिती कार्यालयीन अधिक्षक संतराम जाधव यांनी दिली आहे.

अविघटन कचरा नियंत्रण अधिनियमानुसार राज्य सरकारने महाराष्ट्रात प्लास्टिकचे उत्पादन, वापर,विक्री व.साठवणूकीवर बंदी घातली. आणि प्लास्टिक पासून बनवलेल्या वस्तू वापरासही बंदी घातली आहे. प्लास्टिक बंदीनंतर याच्या काटेकोर अंमलबजावणीची जबाबदारी त्या त्या यंत्रणेवर सोपवली आहे. आणि प्लास्टिक व कॅंरिबगचा वापर करणाऱ्या दुकानदार तथा व्यापाऱ्यावर काडक कारवाई करण्याच्या सुचना दिल्या होत्या. पण शासनाने केलेल्या नियमांना हरताळ फासण्याचे काम व्यापारी, दुकानदार, फळविक्रेते करत होते. त्यामुळे प्लॅस्टिकच्या वापराबाबत आणखी कडख सुचना देवून धडक कारवाई करण्याचे आदेशही शासनाच्या वतीने देण्यात आले होते. शासनाच्या आदेशानुसार नायगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी प्रियंका टोंगे यांनी गुरुवारी शहरात प्लास्टिक विरोधी धडक मोहीम राबवली. व्यापारी, दुकानदार व फळविक्रेत्याकडे तपासणी करण्यात आली. यात अनेक व्यापाऱ्यांकडे कॅंरिबग आढळून आल्याने त्या जप्त करण्यात आल्या. विविध दुकानातून जप्त करण्यात आलेले प्लास्टिक दोन क्विंटल झाले आहेत. त्यानुसार प्लास्टिक व करिबॅंग बाळगणाऱ्या व्यापाऱ्यांना 66 हजार दंड आकारण्यात आला असल्याची माहीती संतराम जाधव यांनी दिली. नायगाव नगरपंचायतने राबवलेल्या धडक मोहीमेत लेखापाल उमेश शिंदे, बि.डी. पाटोदे, अभियंता माधव क्षिरसागर, रामेश्वर बापूले, संभाजी भालेराव, श्रीधर कोलमवार, बसवंत कल्याण, ज्ञानेश्वर जाधव, अजय सुर्यवंशी अदिसह अनेक कर्मचारी सहभागी झाले होते.

You may also like