अवान मोटर्सद्वारे इलेक्ट्रिक स्कूटर ‘ट्रेंड ई’चे अनावरण

शक्ती, परफॉर्मन्स आणि डिझाइनचा योग्य संगम

इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात देशातील सर्वात कार्यक्षम आणि प्रगतीवादी निर्माता कंपनी अवान मोटर्स इंडियाने आपली नवीन स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर ‘ट्रेंड ई’चे बंगळूर येथील ऑटोमोबाइल एक्स्पो २०१९ मध्ये अनावरण केले. इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या आपल्या झेरो सिरीजमधील ही उत्कृष्ट परफॉर्मन्स देणारी नवी स्कूटर ‘ट्रेंड ई’ एका लिथियम आयन बॅटरीद्वारा संचालित आहे आणि ताशी ४५ किमी पर्यंत वेगाचा दावा करते. शिवाय ही इलेक्ट्रिक स्कूटर एक बॅटरीत तब्बल ६० किमी आणि डबल बॅटरीत ११० किमी चालते. लिथियम-आयन बॅटरीच्या चार्जिंगसाठी २ ते ४ तासाचा कालावधी लागतो.

अवान मोटर्स इंडियाचा अत्याधुनिक टेक्नॉलॉजी प्रतिभेवर आणि शक्तीवर असलेला भर ‘ट्रेंड ई’मध्ये देखील दिसून येतो. या गाडीत हायड्रॉलिक टेलिस्कोपिक फ्रंट सस्पेन्शन आणि कॉइल स्प्रिंग रियर सस्पेन्शन आहे. शिवाय या स्कूटरमध्ये अलॉय व्हील्स असून पुढील आणि मागील चाकांवर अनुक्रमे डिस्क आणि ड्रम ब्रेक बसवलेले आहेत. ही स्कूटर १५० किलोपर्यंत वजन घेऊ शकते.

अवान मोटर्सचे व्यवसाय विकास प्रमुख पंकज तिवारी म्हणाले की, “झेरो मालिकेतील नवीन इलेक्ट्रिक स्कूटर ‘ट्रेंड ई’मध्ये तंत्रज्ञान आणि आधुनिक चालकांच्या आवश्यकता पूर्ण करणा-या डिझाइनचा योग्य संगम साधलेला आहे. ‘ट्रेंड ई’ स्कूटरमध्ये प्रत्येक फीचर चालकाच्या आवश्यकता आणि पसंतीच्या आधारे विचारपूर्वक ठेवलेले आहे, जेणे करून वाहनावरून प्रवास करण्याचा एक उत्कृष्ट अनुभव चालकाला मिळू शकेल. हाय ग्राऊंड क्लियरन्ससह, लिथियम आयन डिटॅचेबल बॅटरी पॅक आणि त्याच्या ट्रेंडी लुकमुळे या स्कूटरने क्लास फीचर्समध्ये सर्वश्रेष्ठ स्थान पटकावले आहे.”

इलेक्ट्रिक वाहनांच्या क्षेत्रात देशातील सर्वात कार्यक्षम आणि प्रगतीवादी निर्माता कंपनी अवान मोटर्स इंडियाने आपली नवीन स्मार्ट इलेक्ट्रिक स्कूटर ‘ट्रेंड ई’चे बंगळूर येथील ऑटोमोबाइल एक्स्पो २०१९ मध्ये अनावरण केले. ‘ट्रेंड ई’ एका लिथियम आयन बॅटरीद्वारा संचालित आहे आणि ताशी ४५ किमी पर्यंत वेगासह एक बॅटरीत तब्बल ६० किमी आणि डबल बॅटरीत ११० किमी चालते. यावेळी अवान मोटर्सचे व्यवसाय विकास प्रमुख पंकज तिवारी उपस्थित होते.

You may also like