आपल्या जवानांच्या कार्याला सलाम – कमल हसन

देशाच्या आत्मसन्मानासाठी आपल्या जवानांनी हवं ते आपण केल

आज भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या एअर स्ट्राईकवर ज्य़ेष्ठ अभिनेते आणि मक्कल निधी मय्यम या राजकीय पक्षाचे प्रमुख कमल हसन यांनी प्रतिक्रिया देताना आत्मसन्मान असलेल्या देशाच्या जवानांनी जे करायला हवे ते केले आहे. आपल्या जवानाच्या कार्याला माझा सलाम अशी भावना बोलून दाखविली.

यावेळी पुढे बोलताना कमल हसन म्हणाले, आपल्या सैन्याने आपल्यासाठी जे काही केले त्याचा आम्हाला अभिमान आहे. हे जवान आपले संरक्षण कवच आहेत आणि त्यांनी संरक्षण कवचाला साजेशी कामगिरी केली आहे. त्यामुळे आम्हाला त्यांचा विशेष अभिमान वाटतो, आपल्या जवानांना सलाम. मंगळवारी भारताने पाकव्याप्त काश्मीरमधील खैबर पख्तूनच्या बालाकोट भागात जैश-ए-मोहम्मदच्या तळांवर मोठ्या प्रमाणावर बॉम्ब हल्ले करीत मोठ्या प्रमाणावर दहशतवाद्यांना कंठस्नान घातले यामध्ये जैशच्या टॉप कमांडर्सचा समावेश आहे. जंगल आणि पर्वतीय भाग असणाऱ्या या भागात भारतीय हवाई दलाच्या मिराज २००० या लढाऊ विमानांच्या हल्यात जैशचा म्होरक्या मसूद अझहरचा मेहुणा उस्ताद गौरी याचा खात्मा करण्यात आला असल्याचे परराष्ट्र सचिव विजय गोखले यांनी सांगितले.

You may also like