स्थानिक गुन्हा शाखेचा आयपीसी सोडून महसुल कायद्यावर भर

भगवान श्री गणेशला 3 हजार मोदकांचा नैवेद्य

आयपीसी आणि सीआरपीसी सोडून स्थानिक गुन्हा शाखेने आता महसुल कायद्याचा अवैध असणाऱ्या रेतीवर कार्यवाही करण्याची श्रृंखला सुरू करण्याचा विचार केला आहे. त्यातील पहिला प्रकार काल पिंपळगाव (येवला) व शेलवाडी गावात प्रत्यक्षात आणला. सोबतच इतर दोन गांवामध्ये मात्र आपल्या घरी गेलेल्या गणपतीला 3 हजार मोदकांचा नैवेद्य लावून आपल्या कामगिरीत यश देण्याची प्रार्थना केली आहे.

नांदेडपासून जवळच असलेल्या पिंपळगाव(येवला) व शेलवाडी या दोन गावांमध्ये अवैधरित्या रेतीचे उत्खन्न करणारा जेसीबी आणि कांही ट्रक्टर पकडले. या सर्व ऐवजाची किंमत 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त असल्याचे पोलीसांनी प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीत नमुद आहे. या दोन गावांच्या जवळच शेलगाव, पेनुर आणि भेंडेगाव आहेत या ठिकाणी सुध्दा रेती उत्खन्न होत असते त्या दोन गावांपैकी एका ठिकाणी बंद असलेले मशीन आणि कांही ट्रक्टर स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी पाहिले. त्यांना कार्यवाही होणार हा प्रकार दिसला तेंव्हा त्यांनी 6 महिन्यापुर्वी आपल्या घरी गेलेल्या भगवान श्री गणेशाला 3 हजार मोदकांचा नैवेद्य दाखवला तेंव्हा त्यांचे भले झाले. आयपीसी आणि सीआरपीसीच्या कारवाया नांदेड जिल्हा पोलीस विभागाने आता भरपूर केल्यामुळे त्यांनी आपले लक्ष महसुल कायद्याकडे वळवले आहे. मागे झालेल्या एका धान्य घोटाळ्याच्या कार्यवाहीत महसुल कायद्यातील कलमे आणि आयपीसीची कलमे यावर बरीच चर्चा झाली. सध्या तो गुन्हा राज्य अन्वेशण विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. यापुर्वीच्या पोलीस अधिक्षकांच्या काळात सुध्दा पालम, बिलोली, देगलूर, मुखेड आदी ठिकाणी अशा अनंत अवैध वाळू व्यवसायीकांवर कार्यवाही करण्यासाठी एक विशेष पथक होते. त्या पथकाने करोडो रुपयांचा ऐवज जप्त केला होता. त्यावेळी पोलीस अधिक्षकांनी त्या पथकातील एका पोलीस कर्मचाऱ्याला आपल्या कक्षात चोप दिला होता. पण पोलीस कर्मचाऱ्याने त्याची वाच्यता न केल्यामुळे ते प्रकरण तसेच पडद्या मागे गेले होते.

त्या पथकातील लोकांनी केलेल्या महसुल विभागातील कार्यवाही संदर्भाने सुध्दा भरपूर चर्चा झाल्या. पण त्याचा निर्णय अखेर कांहीच आला नाही. आता सध्या पुन्हा एकदा पहिले पाढे पंचावन अशा प्रकारे पुन्हा एकदा पोलीसांनी त्यातल्या त्यात स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलीसांनी वाळूवर कार्यवाही करून मोठी कार्यवाही केल्याचे दर्शन घडविण्याचा प्रयत्न नक्कीच केला आहे. पण त्यात 3 हजार मोदकांच्या नैवेद्याचे काय? तो नैवेद्य कोणी, कोणाला आणि कसा लावला याचा शोध कोण घेईल. शेलवाडी किंवा पिंपळगाव या दोनच ठिकाणी वाळूचा अवैध उपसा होतो काय? मग याच गावाच्या शेजारी भेंडेगाव पैनुर आदी ठिकाणी वाळू काढणाऱ्यांवर का कार्यवाही झाली नाही हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

You may also like