स्वारातीम विद्यापीठ कर्मचारी पतसंस्थेचा गौरव

दि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.नांदेड यांच्यावतीने भारत सरकारचे माजी केंद्रीय कृषीमंत्री पद्मविभूषण खा.शरदचंद्रजी पवार आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खा.अशोकरावजी चव्हाण यांच्या शुभहस्ते नांदेड जिल्ह्यातील उत्कृष्ट पतसंस्था म्हणून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या. विष्णुपुरी, नांदेडचा नुकताच गौरव करण्यात आला.

एखादी पतसंस्था अश्वासक प्रगतीकडे, विश्वासाकडे, मानवाच्या कल्याणाकडे वाटचाल करीत असते, त्यावेळेला त्या संस्थेमध्ये असंख्य सकारात्मक दर्जा निर्माण करणारे व्यक्तिमत्त्व, नेतृत्व समर्पक भावनेने परिश्रम करीत स्वतःच्या आयुष्याचा अमूल्य असा वेळ खर्च करीत असतात. नेमके हेच स्वारातीम विद्यापीठ पतसंस्थेच्या संचालकांना साधता आले. म्हणूनच पतसंस्था नांदेड जिल्ह्यात उत्कृष्ट पतसंस्था म्हणून नावारूपास आली. पतसंस्थेचा झालेला गौरव आणि पतसंस्थाच्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून पतसंस्थेच्या सर्व सभासदांकडून पतसंस्थेच्या सर्व आजी-माजी संचालकांचा आणि पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा विद्यापीठाच्या अधिसभा सभागृहात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी कुलसचिव डॉ.रमजान मुलाणी, वित्त व लेखाधिकारी डॉ.गोविंद कतलाकुटे आणि परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ.रवि सरोदे यांच्यासह पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव हंबर्डे, माजी अध्यक्ष तथा संचालक शिवराम लुटे, विद्यमान अध्यक्ष संजयसिंह ठाकूर, सचिव उद्धव हंबर्डे आणि वसंत पवार यांची उपस्थिती होती. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शिवाजीराव हंबर्डे (संस्थापक अध्यक्ष), शिवराम लुटे (माजी अध्यक्ष तथा संचालक), रामचंद्र शेंबोले (माजी सचिव तथा उपाध्यक्ष), सौ.वसुधा कोडगिरे (माजी उपाध्यक्ष तथा संचालक), संजयसिंह ठाकूर (अध्यक्ष), उद्धव हंबर्डे (सचिव), बाळासाहेब बोरवंडकर (कोषाध्यक्ष), डॉ.वैजयंता पाटील, महेश त्रिभुवन, अजयकुमार काटे, अनिल कळसकर, अब्दुल बशीर यांच्यासह माजी संचालक अरुण पाटील, डॉ.सरिता यन्नावार, सुधाकर शिंदे (माजी कोषाध्यक्ष), शेख शहाबुद्दीन, डॉ.राजेश काळे, राजू शेरे, सिद्दिक पठाण तसेच पतसंस्थेचे कर्मचारी गोविंद पवार, अंगद मोरे, बालाजी होळकर आदींचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिद्धार्थ तामगाडगे यांनी केले तर आभार राजासाहेब बोराळे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गोविंद हंबर्डे, व्यंकटेश नागरगोजे, दासराव हंबर्डे, शिवाजी हंबर्डे, शिवाजी कल्याणकर, बाबू पोतदार, गंगाधर लुटे यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमास विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्यासंख्येने उपस्थिती होती.

You may also like