सहस्त्रकुंड एकलव्य रेसिडेंसियल पब्लीक स्कुलच्या

नवीन इमारत संकुलाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते उद्घाटन

नाशिक आदिवासी विकास विभाग प्रकल्प कार्यालय किनवट अंतर्गत एकलव्य रेसिडेसियल पब्लीक स्कुल सहस्त्रकुंड येथील नवीन इमारत संकुलाचे उद्घाटन प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी यांचे हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा येथून शनिवार 16 फेब्रुवारी 2019 रोजी होणार आहे. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांना सहस्त्रकुंड येथे ऑनलाईन दाखविण्यात येणार आहे. यावेळी जिल्हाधिकारी अरुण डोंगरे हे उपस्थित राहणार असून या कार्यक्रमास परिसरातील नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन किनवटचे प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे.

या इमारतीचे बांधकाम सन 2016-17 मध्ये सुरु करण्यात आले आहे. या बांधकामास 24 महिण्याचा कालावधी देण्यात आला होता. या इमारतीसाठी 15 एकर जागा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. इमारतीचे बांधकाम 10 हजार 862 चौ.मी. इतके करण्यात आले आहे. शाळा इमारत बांधकाम अंतर्गत शाळा इमारत, मुलांचे वसतीगृह, मुलींचे वसतीगृह, भोजनगृह, प्राचार्य निवासस्थान, शिक्षक निवासस्थान, खेळांचे मैदान, अभ्यंगतासाठी शौचालय, विद्युतघर, खेळाडुसाठी मैदानावर चैजिंग रुम (शौचालयासह), वाहनतळ, अंतर्गत पक्के रस्ते, संरक्षक भिंत, ट्रिट लाईट, पाणी साठवण अंडरग्राउट टाकी 1.5 लक्ष लिटर. या शाळा बांधकामासाठी 15 एकर जमिन उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जमिनीवर 24 कोटी 16 लाख रुपये बांधकाम अंदाज पत्रकास मंजुरात प्राप्त असून इमारत संकुल बांधकाम पुर्ण झालेले आहे.

एकलव्य रेसिडेसिंयल पब्लीक स्कुल ही योजना केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. या शाळेत इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत वर्ग मान्यता आहे. या शाळेची एकुण प्रवेश क्षमता 420 असून 210 मुले व 210 मुलींना प्रवेश देण्यात येतो. अमरावती विभागातील एकुण 13 जिल्ह्यासाठी चिखलदरा व सहस्त्रकुंड या दोन शाळामध्ये विद्यार्थ्यांना पात्रता परिक्षा घेऊन गुणानुक्रमे प्रवेश देण्यात येतो. या शाळेचा आदिवासी जमातीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी लाभ होणार आहे.

उत्तर प्रदेशचे जलसिंचन, अल्पसंख्याक राज्यमंत्री सरदार बलदेव सिंघ यांचा दौरा
उत्तर प्रदेश राज्याचे जलसिंचन व अल्पसंख्याक विकास विभागाचे राज्यमंत्री सरदार बलदेव सिंघ हे नांदेड दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे राहिल. सोमवार 18 फेब्रुवारी 2019 रोजी दिल्ली येथून विमानाने सायं 5.05 वा. श्री गुरु गोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथे आगमन. सायं. 5.15 वा. शासकीय विश्रामगृह नांदेडकडे प्रयाण. सायं. 5.30 वा. शासकीय विश्रामगृह नांदेड येथे आगमन व रात्री मुक्काम. मंगळवार 19 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी 10 वा. तख्त सचखंड श्री हुजूर अबचलनगर साहिब गुरुद्वारा येथे दर्शन व नांदेड शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम. बुधवार 20 फेब्रुवारी 2019 रोजी श्री गुरुगोविंदसिंघजी विमानतळ नांदेड येथून दुपारी 3.20 वा. हैद्राबादकडे प्रयाण करतील.

You may also like