हिंगोली लोकसभा मतदार संघात खा.सातव यांना पराभूत करण्यासाठी शिवसेना सक्षम उमेदवाराच्या शोधात

निवडणूक आयोगाने १० तारखेला सायंकाळी ५ वाजता लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून, या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष सजग झाले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील सार्वधिक चर्चेचा विषय ठरलेल्या हिंगोली लोकसभा मतदार संघात अनेक राजकीय पक्ष संघटना निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असले तरी, खरी लढत काँग्रेस – राष्ट्रवादी आघाडी आणि भाजप – सेना युतीच्या उमेदवारात होणार हे वास्तव सत्य कोणालाही नाकारता येणार नाही.

मागील सण २०१४ च्या लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे माजी खा. सुभाष वानखेडे याना पराभूत करून विद्यमान खा. एड.राजीव सातव यांनी विजयश्री मिळविली होती. त्यामुळेल सुभाष वानखेडे यांचा अल्पशः मतांनी प्रभाव झाला होता अशी साल वानखेडच्या मनात सलत असताना ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर माजी खा.सुभाष वानखेडे यांनी शीवसेनेला अखेरचा जमहाराष्ट्र करून भाजपमध्ये प्रवेश केला होता. दरम्यानच्या काळात झालेल्या घडामोडीनंतर २०१९ च्या निवडणुकीच्या कार्यक्रम जाहीर झाला असून, काँग्रेसकडून विद्यमान खा.राजीव सातव हे ग्राह्य उमेदवार मानले जात आहेत. त्यामुळे पक्षस्रेष्टीने देखील काँग्रेस आघाडीचे उमेदवार म्हणून एड.राजीव सातव यांच्या नावाला हिरवी झंडी दाखविली आहे. तर शिवसेना – भाजपच्या युतीत हा मतदार संघ शिवसेनेच्या वाट्याला आला आहे. त्यामुळे शिवसेनेकडून माजी जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, माजी खा.जयप्रकाश मुंदडा, नांदेड दक्षिणचे आ.हेमंत पाटील आणि हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे आ.नागेश पाटील आष्टीकर यांच्या नावाची चर्चा होत आहे. परंतु वरील पैकी कोणाला उमेदवारी मिळते यापेक्षा माजी खा.सुभाष वानखेडेंची घर वापसीची चर्चा जास्त जोरात होताना दिसून येत आहे.

कारण माजी खा.सुभाष वानखेडे यांनी तशी मातोश्रीवरून फिल्डिंगही लावली असून, एड.राजीव सातव याना शह देण्यासाठी सुभाष वानखेडें सारखा दुसरा कोणताही उमेदवार नसल्यामुळे त्यांची इंट्री लवकरच शिवसेनेमध्ये होण्याची जोरदार चर्चा जोर धरून आहे. २०१४ च्या निवडणुकीत वानखेडे हे अल्प मतांनी पराभूत झाले आहेत. हिंगोली लोकसभेच्या ३५०० गावांपैकी ३३५० गावामध्ये भेटी देणारा आणि मतदार संघाच्या विस्तार असलेल्या माथा ते पायथा असा विचार केल्यास वानखेडेचा सर्वदूर स्वपरिचय आहे. त्यामुळे शिवसेनेच्या उमेदवारीसाठी अनेकांनि पक्षस्रेष्टीकडे साकडे घातले असून, त्यांची नावे चर्चिल्या जात असली तरी या मतदार संघात वानखेडें नावाचेच कार्ड चालू शकते हे सर्वांच्या चर्चेतून पुढे येत आहे. एकूणच लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यामुळे आणि निवडणुकीला फारच कमी अवधी शिल्लक असल्याने शिवसेनेचा उमेदवार कोण..? याची उत्सुकता शिगेला पोचली आहे. परंतु शिवसेनेच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्याची काँग्रेसचे खा. राजीव सातव यांच्या तोडीचा सक्षम उमेदवाराच्या शोधात असलेली शोध मोहीम माजी खा.सुभाष वानखेडे यांच्या पर्यंत येऊन थांबू शकते असेहि काही राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

मतदारसंघातील समिकरणे बदलण्याची शक्यता…!  

2014 साली भाजप-शिवसेनेची युती होती. जागा वाटपात परभणी व हिंगोली लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे गेला. या पक्षाने परभणीचा गड सर केला तर हिंगोलीत सेना उमेदवाराचा नाममात्र मतांनी पराभव झाला होता. आता या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपने आपले उमेदवार उभे करण्याची तयारी करून, योगी शाम भारती यांच्या नावाला प्राधान्य दिल्यामुळे आणि शिवसेनेला सुभाष वानखेडे यांच्या सारखा दुसरा उमेदवार भेटत नसल्यामुळे मतदारसंघातील समिकरणे बदलून हि जागा भाजपाकडे तर जाणार नाही ना…? याबाबत साशंकता निर्माण होऊ लागली आहे. असे झाले तर हिंगोली लोकसभेचे समीकरण पार बदलण्याची शक्यता आहे.

You may also like