होय…! मी सावित्री बोलतेय..! एकपात्री एकांकिका रंगली

स्त्री शिक्षणाच्या आद्य पुरस्कर्त्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त जवळा (दे.) येथील क्रांतीज्योती बालविकास मंचाच्यावतीने होय! मी सावित्री बोलतेय! या एकपात्री नाटकाचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक गंगाधर ढवळे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष किशनराव गच्चे, एस.एम. घटकार, लिंगराम हंडरगुळे, कमल गच्चे यांची उपस्थिती होती.

क्रांतीज्योती सावित्री फुले यांच्या १२२ व्या स्मृतीदिनानिमित्त जवळा (दे.) येथील जि.प. शाळेत अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. मुख्याध्यापक ढवळे जी.एस. यांच्यासह मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यानंतर कु. दिव्या गच्चे या इयत्ता पाचवीतील मुलीने होय! मी सावित्री बोलतेय! हा एकपात्री प्रयोग सादर केला. या चिमुकलीच्या विलोभनीय अभिनयाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. यावेळी बालविकास मंचाच्या पल्लवी गोडबोले, पायल ढगे, प्रियंका गोडबोले, साक्षी झिंझाडे, अंजली झिंझाडे, संध्या गच्चे, गंगासागर शिखरे, संघमित्रा गच्चे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

You may also like