लोखंडवाडी येथील लोकांना पाण्यासाठी करावी लागतेे भटकंती

इस्लापूरपासून 10 ते 12 कि.मी. अंतरावर लोखंडवाडी गाव आहे. ह्या गावात मार्च महिन्यात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असल्याचे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना लोखंडवाडी येथील रहिवाशी असलेले किसन कोल्हेकर यांनी सांगितले.

गावात दोन-तीन दिवसाआडा पाणी येते, ते कोणत्या गल्लीला येते तर काही गल्लीला पाणी येत नाही. त्यामुळे आम्हाला आमच्या शेतातील बोअर सर्वे नं. 13 मधील बोअरचे पाणी बैल गाडीने न्यावे लागते, अशी माहिती दिली. तेव्हा आमच्या प्रतिनिधीने लगेचच तेथील सरपंच बालाजी फोले यांना संपर्क साधला असता त्यांनी तर प्रथम तर उडवाउडवीचे उत्तरे दिली, परंतु पुन्हा नंतर काहीवेळानंतर त्यांनीच फोन करून सांगितले की, वीज वितरण कंपनीचे बिल 1 लाख 20 हजार बाकी आहे. तेव्हा आपणास बिल भरायचे आहे. तेव्हा गावकऱ्यांनी विनंती केली की, घरपट्टी-नळपट्टी भरा असे सांगितले. तेव्हा गावकऱ्यांनी किनवट ता. इस्लापूर, शिवणी, जलधरा दुष्काळ जाहीर केला आहे. तेव्हा आम्ही घरपट्टी, नळपट्टी भरणार नाही असे उडवाउडवीचे उत्तर देतात.

तसेच आम्ही जानेवारी महिन्यातच एक बोअर अधिग्रहण केली आहे. तसेच गावातील पाईपाईपलावर दीडशे नळे व त्याला थुट्या बसविल्या आहेत. त्या गावातील लोकांनी एकाही नळाला थुटी ठेवली नाही, यामुळेच काही लोकांना पाणी मिळते तर काही लोकांना पाणी मिळत नाही. कारण नळाच्या थुट्या नसल्या कारणाने लाखो लिटर पाणी वाया जात आहे, अशी माहिती सरपंच बालाजी फोले यांनी आमच्या प्रतिनिधीशी मोबाईलवरून बोलताना माहिती दिली.

विशेष म्हणजे गावकरी मिटींट न झाल्याने घरपट्टी, पाणीपट्टी न भरल्याने त्या नळच्या टूट्या बसविल्या नाहीत असे त्यांच्या बोलण्यावरून दिसते, परिणामी जनतेला पाण्यासाठी वणवण भटकावे लागते, हे सरपंच तुम्हाला का दिसत नाही, असे बैलजोडीने पाणी नेणारे किसन कोल्हेकर बोलताना माहिती सांगितली. मग अधिग्रहण केलेल्या बोअरला काय पाणी न देताच त्यांचे बिले काढणार काय असा प्रश्न गावकरी करीत होते. या सर्वच कारभारास जबाबदार कोण ? असा प्रश्न गावकऱ्यांनी मांडला.

You may also like