अंनिस’चे डॉ. हमीद दाभोळकरांची जिज्ञासा’ला भेट

श्रध्दा असावी अंधश्रध्दा नसावी

श्रध्दा असावी पण ती अंध श्रध्दा असता कामा नये हिम्मत असेल तरच तुम्ही भविष्य घडवू शकता अन्यथा नाही. गंढे-दोरे बांधून देवाची प्रार्थना केल्याने तुम्हाला यश मिळणार नाही त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. तणाव हा समुद्राच्या लाटे सारखा असतो असे मार्गदर्शन अंध श्रध्दा निर्मुलन समितीचे राज्य संघटक डॉ. हमीद दाभोळकर यांनी केले.

लोह्यातील जिज्ञासा अभ्यासिका व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र डॉ. हमीद दाभोळकर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला यावेळी अंनिस’चे शहाजी भोसले, इंजी सम्राट हाटकर, ओमप्रकाश दरक यांची उपस्थिती होती. परिवर्तन’चे राज्य संघटक डॉ. हमीद दाभोळकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले कि तणाव हि समुद्राच्या लाटे सारखा असतो भांडण व्यसन टोकाचा विचार हि तणावाची करणे आहेत. विद्यार्थ्यांनी पास होण्यासाठी मनात हिम्मत ठेवावी लागते. गंडे दोरे बांधून प्रार्थना करत देवाची धावा आपण करू लागलो तर यश मिळणार नाही पास होणार नाही तसे झाले तर तणाव वाढतो तणाव मुक्ती साठी नियोजनबध्द जीवन प्रणाली असावी लागते.

विद्यार्थ्यांनी श्रध्दा असावी पण अंध श्रध्दा ठेवू नये असे सांगून डॉ. हमीद दाभोळकर यांनी विद्यार्थ्यांशी मुक्त संवाद साधला. त्यांच्या शंकाचे निरासरन केले. शहाजी भोसले यांनी हि माहिती दिली. राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक काशिनाथ शिरसीकर यांनी परिचय व प्रास्ताविक केले जिज्ञासा’च्या वतीने डॉ. दाभोळकर व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिज्ञासा’चे हरिहर धुतमल, प्रशांत मोटरवार, पत्रकार शेख अहमद, रत्नाकर महाबळे, फेरोज मनियार, गजानन कळसकर, बालाजी धनसडे, शिवप्रसाद वाळके, सुधीर धनसडे,मोरे, तनय धुतमल, शुभम गोडबोले यासह विद्यार्थ्यी उपस्थित होते.

You may also like