नांदेड| महात्मा कबीर समता परिषदेच्यावतीने देण्यात येणार महाराष्ट्र भूषण जीवनगौरव पुरस्कार एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य तथा दै. लोकपत्रचे आवृत्ती संपादक डॉ. गणेश जोशी यांना जाहीर झाला आहे.
एमजीएम पत्रकारिता महाविद्यालयाचे प्राचार्य तथा दै. लोकपत्रचे आवृत्ती संपादक यांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्याची दखल घेत महात्मा कबीर समता परिषदेकडून 2023 चा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा महाराष्ट्र भूषण जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे, अशी माहिती महात्मा कबीर समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकूंदराज पाटील, उपाध्यक्ष देवानंद कांबळे, मार्गदर्शक डॉ. बलदेवसिंह चव्हाण, डॉ. सय्यद जबार पटेल, सा.ना. भालेराव, स्वच्छतादूत माधवराव पाटील झरीकर, प्राचार्य माधव जाधव यांनी निवड पत्राद्वारे कळविले आहे. याबद्दल डॉ. गणेश जोशी यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.