शहीद जवानांपैकी 6 जणांनी मुदखेडमध्ये घेतले होते प्रशिक्षण

शहरात सर्वत्र पाकिस्तान मुर्दाबाद

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यात भारतीय सिमा रक्षक दलाचे जवान ठार झाले. त्या जवानांमध्ये सहा जणांनी नांदेड जिल्ह्यातील मुदखेडच्या सिआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात आपली तयारी पूर्ण करून दहा दिवसांपूर्वीच ते कार्यकारी दलात सहभागी झाले होते. आज दिवसभर नांदेमध्ये ठिकठिकाणी दहशतवादाचा पुतळा जाळून आपल्या शहीद जवानांना आदरांजली वाहत जनतेने पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

काल कश्मिर येथील पुलवामा या रस्त्यावर एका दहशतवाद्याने 200 किलो आरडीएक्स भरलेली एक चार चाकी गाडी जवानांच्या गाडीला भिडवली. त्यात झालेल्या स्फोटात 42 जवान ठार झाले. स्फोट होताच अनेकांनी बाहेरून जवांनावर तुफान गोळीबार केला. अनेक जण जखमी अवस्थेत उपचार घेत आहेत. या हल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली. प्रत्येक जण आता एकदा शेवटचे युध्द होवू द्या अशी मागणी करत आहे.

शहीद झालेल्या जवांनामध्ये जी. सुब्रम्हन्यम (82 बटालीयन), तामिळनाडू,एस.गुरू(82 बटालीयन) कर्नाटक, हेमराज मिणा (61 बटालीयन) कोटा, प्रसन्न साहू (61 बटालीयन) ओडीसा, अश्विनी कावोची (35 बटालीयन) मध्यप्रदेश आणि रतनकुमार ठाकूर (गु्रपसेंटर, काटगोदाम) बिहार, या सहा जवांनानी नांदेड जिल्ह्यातील मुदखेड येथे असलेल्या सिआरपीएफ प्रशिक्षण केंद्रात आपले प्रशिक्षण पुर्ण केले होते. आणि दहा दिवसांपुर्वीच ते आपल्या बटालियनमध्ये सामिल झाले होते आणि देशसेवेत त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हे सहा जवांन नांदेडच्या प्रशिक्षण केंद्रात होते याची माहिती प्रशिक्षण केंद्राचे विशेष पोलीस महानिरिक्षक राकेशकुमार यादव यांनी दिली आहे.

भारताच्या कोणत्याही कोपऱ्यातून कोठेही जाणारा माणूस हा अखेर भारताशीच जोडलेला असतो हे या सहा जवांनानी दाखवून दिले आहे. त्यांचे घर कोठे होते, त्यांनी प्रशिक्षण कोठे घेतले आणि प्रत्यक्षात काम कोठे करायला गेले याचे गणित सोडवायचे प्रयत्न केले तर त्याचे उत्तर खुप अवघड आहे. सिआरपीएफच्या प्रशिक्षण केंद्रात सुध्दा शहीद झालेल्या जवांनाना आदरांजली वाहण्यात आली. नांदेड शहरात आज दिवसभर जुना मोंढा टावर, छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, वजिराबाद चौक आदींसह अनेक ठिकाणी सर्वच लोकांनी आपल्या सैनिकांप्रती आदरांजलीचा कार्यक्रम घेतला होता. याप्रसंगी सर्वच ठिकाणी दहशतवादाचा पुतळा जाळण्यात आला आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणांनी आसमंत गजबले.

You may also like