मुखेडात प्रेमी युगलाची आत्महत्या

जळकोट तालुक्यातील कोळनुर येथील प्रेमीयुगल रहिवाशी
मामाच्या गावी केली आत्महत्या

मुखेड तालुक्यातील कासरवाडी येथील खुशाल देवकत्ते यांच्या शेतात जळकोट तालुक्यातील कोळनुर या गावातील प्रेमी युगलाने चिंचेच्या झाडाला गळफास लावू आत्महत्या केल्याची घटना दि. 21 रोजी रात्री उशीरा घडली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस उपविभागीय अधिकारी रमेश सरवदे यांनी तात्काळ मुखेड येथे भेट दिली.

सविस्तर वृत्त असे की, जळकोट तालुक्यातील गणपती ऊर्फ पारस निवृत्ती नरोटे वय 25 वर्ष व धनश्री माधव चोले वय 20 वर्ष हे दोघेही कोळनुर या गावातील रहिवाशी असून यातील मुलगा पोलीस भरतीची तयारी करत होता तर मुलगी नांदेड येथे पॉलटेक्नीक कॉलेजला शिक्षण घेत होती. दोघांचेही एकमेकावर प्रेम होते तर दोघेही मामाच्या गावला म्हणून मुखेड तालुक्यातील कासरवाडी या गावात आले होते दि. 21 रोजीच्या रात्री शेतात येऊन चिंचेच्या झाडाला गळफास करुन आत्महत्या केली. सकाळी शेतात जनावरे चारण्यासाठी महिला आली असताना आत्महत्या केल्याचे दिसले ही बाब तात्काळ मयत मुलाच्या मामाच्या घरी सांगीतली. बघता बघता या आत्महत्येची घटना गावासह तालुक्यात वा­ऱ्यासह पसरली.

फिर्यादी राम राजबा देवकत्ते वय 65 वर्ष रा. कासरवाडी ता. मुखेड यांच्या फिर्यादीनुसार दि. 22 रोजी मुखेड पोलिस ठाण्यात 8/2019 कलम 174 सीआरपीसी नुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. याचा तपास पोलिस निरीक्षक सुभाष राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोउनि प्रकाश सांगळे यांच्या सहकार्याने पोलिस हेड कॉन्स्टेबल सुनिल पांडे हे करीत आहेत. …….ज्ञानेश्वर डोईजड, मुखेड.

You may also like