कॉग्रेसच्या एका बड्या माजी मंत्र्यांना आ. चिखलीकरांच्या विरोधात निवडणुकीसाठी गळ ?

लोहा विधानसभा मतदार संघात आ. चिखलीकरांच्या विरोधात लढण्यासाठी कॉग्रेसच्या एका बड्या माजी मंत्र्यांना उतरविण्यासाठी नांदेडमधून विनंती करण्यात आली. परंतु मागील निवडणुकीत पाच हजारी मते पाहता त्या मंत्र्यांनी स्पष्ट नकार दिला. यासह अन्य पैलू कॉग्रेस श्रेष्ठी पडताळून पाहत आहेत. कार्यकर्तानी आम्ही बेसावध राहणार नाही ….कोणीही येऊ द्या …आम्ही आपल्या पाठीशी खंबीर उभे आहोत… आपण म्हणजेच आमचा पक्ष…जो आदेश द्याल तो मान्य असा .निर्धार कार्यकर्त्यांनी एकमुखाने प्रतापरावांना दिला.

निमित होते सुनेगाव शाळेच्या प्रांगणात प्रमुख कार्यकर्त्याशी हितगुज २५ १५ अंतर्गत वाडी तांडे गावांना निधी पत्रकारांचा सन्मान व मुख्यमंत्री चषक बक्षीस वितरण असा भरगच्च कार्यक्रम पार पडला. आ. प्रताप पाटील चिखलीकर लोकसभा लढविणार म्हटल्यानंतर कॉग्रेसच्या गोटात धडकी भरली होती. परंतु यापूर्वी आणि आज प्रतापराव पाटील यांनी लोकसभा लढविणार नाही असा निर्णय कार्यकर्त्यांना सांगून टाकला. त्यामुळे कार्यकर्ते उत्साहित झाले.त्यांच्या बोलण्यात ते आगामी काळात भाजपा सोबत राहतील व लोकसभेसाठी उमेदवारांना मताधिक्य मिळून देण्याचा मानस दिसला.

नांदेड अहमदपूर दौऱ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आ. प्रतापराव पाटील यांच्यात पंधरा मिनिटे चर्चा झाली. ती राजकीय स्वरुपाची तसेच मतदार संघाच्या विकासासंदर्भात होती. परंतु त्यातील संपूर्ण तपशील समोर आला नाही परंतु आज सुनेगावात झालेल्या बैठकीत प्रतापराव पाटील यांना पराभूत करण्यासाठी कॉग्रेस नेतृत्व वेगवेगळ्या कर्त्यत्या लढविणार आहे हे प्रमुखांच्या भाषणातून दिसले. राज्यातील कॉग्रेसच्या एका बड्या माजी मंत्र्यांना लोहा विधानसभा मतदार संघात निवडणूक लढविण्याची ‘गळ’ घालण्यात आली. कार्यकर्त्यांना’ हर्ष ‘झाला. उत्साहाचे’ वर्धन’ सुरु असतानाच त्या बड्या माजी मंत्र्यांनी पाच हजारी मतदान ऐकताच नको रे बाबा ! असा निरोप पाठविला …या संपूर्ण घडामोडीमुळे कार्यकर्त्यांनी प्रतापरावांना आम्ही पाठीशी आहोत ..कोणीही येऊ द्या असा दृढ विश्वास हात उंचावून व्यक्त केला. मातोश्री वर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलावले आहे. माजी मंत्री आ. मुदंडा यांनी निरोप दिला आहे. असे कार्यकर्त्यांनी प्रतापरावांनी सांगितले व त्यांच्या भावना जाऊन घेतल्या

पक्ष बदलत गेलो ते केवळ तुमच्या विश्वासावर पाठबळावर तुमची साथ हीच ताकद आहे अशी भावनिक साद प्रतापरावांनी कार्यकर्त्यांना घातली. राष्ट्रवादी कॉग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्यात लोहा मतदार संघाविषयी झालेल्या चर्चेला तपशील एका पदाधिकारयांनी सांगितला आपणास कोणत्या पक्षाकडून उमेदवारी ऑफार आहे. याचा अतिशय खुमासदार भाषेत त्यांनी कार्यकर्त्यांना किस्सा सांगितला. आ. प्रताप पाटील यांच्या विरोधात पश्चिम महाराष्ट्रातील माजी मंत्र्यांना घातलेली गळ आणि त्यांनी दिलेला नकार पाहता येत्या काळात प्रतापराव विरुद्ध एकास एक लढत करण्याचा कॉग्रेस नेत्यांचा डावपेच दिसतो आहे. या बैठकीत भाजप महानगर अध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे, कंधारचे कृउबा सभापती बाबुराव केंद्रे , माजी आरोग्य सभापती प्रवीण पाटील, जि प सदस्या प्रणिताताई देवरे, संगानि समिती कंधार च्या अध्यक्षा चित्ररेखा गोरे, माजी उपनगराध्यक्ष जाफर उल्लेखान यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केले.

डॉ.संतुकरावांना आमदारकीची घाई
कार्यकर्त्यांच्या बैठकीस नांदेड महानगर अध्यक्ष डॉ संतुकराव हंबर्डे यांनी मनोगत व्यक्त केले प्रतातपराव जिल्ह्याचे नेते आहेत. तुम्ही नामदार व्हा आणि मला आमदार करा..” पैशाची चिंता करू नका. मी आहे असे आवर्जून सांगितले यावर टाळ्या पडल्या. शिवाय डॉ संतुकरावांना आमदारकीची घाईच झाली अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या पण नांदेड दक्षिण मधून अल्पसा मतांनी पराभूत झालेले दिलीप कंदकुर्ते यांची उमेदवारी साठी प्रबळ दावेदारी आहे यांची चर्चा सुरू आहे.

You may also like