लोकसभा निवडणुकीत खर्चाची रक्कम 70 लाख

अनामत रक्कम सर्वसाधारण 25 हजार
राखीव प्रवर्गासाठी 12 हजार 500

लोकसभा निवडणुक जाहीर झाल्यानंतर नांदेड लोकसभा मतदारसंघ क्रं.16 च्या संदर्भाने माहिती देतांना यंदाच्या निवडणुकीत उमेदवाराला खर्चाची मर्यादा 70 लाख रुपये करण्यात आली असून सर्वसाधारण उमेदवारांकरीता 25 हजार रुपये अनामत रक्कम तर राखीव प्रवर्गाच्या उमेदवारांकरीता 12 हजार 500 रुपये अशी अनामत रक्कम असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणुक निर्णय अधिकारी अरुण डोंगरे यांनी पत्रकार परिषदेेत दिली.

भारताच्या निवडणुक आयुक्तांनी काल दि.10 मार्च रोजी लोकसभेची निवडणुक जाहीर केली. 543 लोकसभेच्या मतदार संघामध्ये विविध 7 टप्यांमध्ये निवडणूका होणार आहेत. त्यात महाराष्ट्रात चार टप्यामध्ये निवडणूका होणार आहेत. त्यानुसार निवडणुकीची अधिसुचना 18 मार्च रोजी जारी होईल इतर तिन टप्यांमध्ये 19 मार्च, 28 मार्च आणि 2 एप्रिल रोजी निवडणुक अधिसुचना प्रसिध्द होईल. नामनिर्देशन पत्र सादर करण्याचा अंतिम दिनांक 4 टप्यांमध्ये 25 मार्च, 26 मार्च, 4 एप्रिल आणि 9 एप्रिल असा असेल. नामनिर्देशन पत्रांची छाननी 26 मार्च, 27 मार्च, 4 एप्रिल आणि 9 एप्रिल रोजी होईल.उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दि.4 टप्यांमध्ये 28 मार्च, 29 मार्च, 4 एप्रिल आणि 12 एप्रिल असा आहे. मतदानाचा दिनांक वेगवेळ्या चार टप्यांमध्ये 11 एप्रिल, 18 एप्रिल, 23 एप्रिल आणि 29 एप्रिल असा आहे. या जाहीर सुचनेसह निवडणुकीची आचार संहिता जाहीर झाली आहे. नांदेड लोकसभा मतदार संघाचा मतदानाचा दिवस 18 एप्रिल असा आहे.

नांदेड लोकसभा मतदारसंघात एकूण 1996 एवढे मतदान केंद्र असतील. त्यामध्ये एकूण मतदारांमध्ये 883138 लक्ष पुरुष आणि 817795 लाख महिला. 58 मतदार तृतीय पंथी आहेत. या नांदेड लोकसभा मतदार संघात भोकर, नांदेड दक्षिण, नांदेड उत्तर, नायगाव, देगलूर आाणि मुखेड हे विधानसभा मतदार संघ येतात. नांदेड जिल्ह्यातील किनवट, लोहा , हदगाव हे तीन विधानसभा मतदार संघ वेगळ्या लोकसभा मतदार संघात आहेत. ज्यात एक मतदार संघ लातूर आणि एक हिंगोली असा आहे. लातूर लोकसभा मतदारसंघात नांदेडचा लोहा विधानसभा मतदार संघ येतो आणि हिंगोली लोकसभा मतदार संघात किनवट आणि हदगाव हे दोन विधानसभा मतदार संघ येतात.

या निवडणुकीसाठी 3291 केंद्र प्रमुख नियुक्त होणार आहेत. त्यासाठी 4417 उपलब्ध आहेत. मतदान अधिकारी-1 या पदासाठी 3291, प्रत्यक्षात उपलब्ध 4395, मतदान अधिकारी-2 या पदासाठी गरज 3291 लोकांची प्रत्यक्षात उपलब्ध 4595, मतदान अधिकारी-3 3291 प्रत्यक्षात 4695 उपलब्ध, इतर मतदान कर्मचारी 3291 प्रत्यक्षात उपलब्ध 4877, सुक्ष्मनिरिक्षक 112 ची गरज आणि प्रत्यक्षात उपलब्ध 125. नांदेड जिल्ह्याच्या मतदानासाठी एकूण 6698 बी.यू., 3816 सी.यू. आणि 4125 व्ही.व्ही.पी.ए.टी. उपलब्ध आहेत. 271 वेगवेगळे सेक्टर यासाठी उपलब्ध करून देण्यात आले आहे. 251 एस.टी.बसेस उपलब्ध आहेत. सेक्टर अधिकाऱ्यांसाठी 251 वाहने आहेत. एका महिन्यासाठी एकूण 134 वाहने स्वतंत्रपणे उपलब्ध आहेत. त्यात निरिक्षकांसाठी 14 आणि जीप या प्रकारची 400 वाहने उपलब्ध आहेत.

या लोकसभा निवडणुकीमध्ये मतदान यंत्र सुरक्षीत ठेवण्यासाठी किनवटमध्ये मतदान यंत्र आय.टी.आय.किनवट येथे ठेवले जाणार आहे. हदगाव येथे समाजकल्याण मुलांचे वस्तीगृह. भोकर येथे सामाजिक न्याय भवन मुलांचे वस्तीगृह, नांदेडच्या उत्तर आणि दक्षीणचे मतदान यंत्र शासकिय तंत्रनिकेतमध्ये राहणार आहे. लोहाचे तहसील कार्यालयात, नायगावचे सामाजिक न्यायभवन, देगलूरचे पंचायत समिती सभागृह आणि मुखेडचे जिल्हा परिषद मुलींची शाळा येथे राहणार आहेत. दि.23 मे रोजी मतमोजणी होईल तेंव्हा मुख्य मतमोजणीच्या ठिकाणी हे सुरक्षीत ठेवलेले यंत्र पाठवले जाणार आहे. नांदेड जिल्ह्यात भोकर-5, नांदेड उत्तरमध्ये-9,नांदेड दक्षिण-5, नायगाव-11, देगलूर-7, मुखेड-9, लोहा-2, हदगाव-7 आणि किनवट-16 असे 71 संवेदनशिल मतदान केंद्र आहेत. त्यातील नांदेड लोकसभा मतदार संघात 46 मतदार केंद्र संवेदनशिल आहेत.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागावर चांगलेच निर्बंध लावण्यात आले आहे. या निर्बंधामध्ये निवडणुक जाहीर झाल्यापासून 72 तासांमध्ये आपल्या जिल्ह्यातील कोणतेही काम सुरू झाले नसेल तर ते निवडणुकीपर्यंत सुरुच करता येणार नाही. त्यासाठी प्रत्यक्षकामाची सुरूवात झालेल्या कामांची यादी आणि न सुरू झालेल्या कामांची यादी निवडणुक आयोगाला देणे बंधनकारक आहे. इतर माहितीमध्ये शासकीय संपतीचे विद्रुपीकरण करू नये. खाजगी संपतीचे विद्रुपीकरण केले असेल आाणि ते निवडणुकीसंदर्भाने असेल तर निवडणुक जाहीर झाल्यापासून 72 तासात काढून टाकणे बंधनकारक आहे. निवडणुकीसंदर्भाने कोणतीही तक्रार आली तर ती तक्रार 24 तासात यंत्रणा कार्यान्वीत करून तिचा निकाल लावण्यात येईल. एक स्वतंत्र नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. ध्वनीक्षेपकांचा आवाज सकाळी 6 पुर्वी व रात्री 10 वाजेनंतर करता येणार नाही. हा आदेश 11 मार्च ते 19 एप्रिलपर्यंत लागू राहिल. फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 सर्वत्र लागू करण्यात आले आहे.

उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल करतांना निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या परिसरात घोषणा देणे, वाद्य वाजविणे, गाणे म्हणने आणि कोणताही निवडणुक प्रचार करण्यास बंधन आहे. वाहनांच्या ताफ्यांमध्ये तीन पेक्षा जास्त वाहने निवडणुक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयातील 100 मिटर परिसरात आणण्यावर बंधन आहे. तसेच नामनिर्देशनपत्र दाखल करतांना 5 पेक्षा जास्त माणसांना प्रवेश मिळणार नाही. अंतर राज्यीय सिमेवर पोलीस व महसुल अधिकारीचे चेकपोस्ट उभारून तपासणी करतील.अशा एकूण 16 चेकपोस्ट नांदेड जिल्ह्यात असतील. रेल्वेने त्यातून दारु येणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. सोशल मिडीयावर अत्यंत कडक नजर राहणार आहे. विजीलन्स ऍपवर फोटो काढून तक्रार करता येईल.

विविध कामांसाठी अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. ज्यात लॉयन ऑर्डर-संतोष वेणीकर, फोर्स डिपल्यामेंट-पोलीस उपअधिक्षक गृह मोरे, ट्रेनिंग मॅनेजमेंट अतिरिक्त जिल्हाधिकारी कुशलसिंह परदेशी, इन्फरमेशन मॅनेजमेंट-प्रशांत शेळके, इव्हीएम आणि पोस्टल मतदान-लतिफ पठाण, निवडणुक खर्च सेल-गगड, सोशल मिडीया सेल-डॉ.दिपक शिंदे, हेल्पलाईन ऍन्ड कम्पलेंट ग्रिव्हीएन्स-गिता ठाकरे, निवडणुक अधिकारी सेल-उपजिल्हाधिकारी नांदेड, निरिक्षक सेल-राम गगराणी, कम्युनिकेशन प्लॅन-उपजिल्हाधिकारी , एम्पोईज मॅनेजमेंट पांगरकर, ट्रॉन्स्पोटेशन सेल-तहसीलदार पांगरकर, कॅम्प्युटर सेल-कर्णेवार, टोल फ्रि नंबर सेल-प्रिया पाटील, ऑनलाईन ऍप-प्रदीप डुणे, इलेक्शन मटेरीयल मॅनेजमेंट-सुपेकर, एस.व्ही.ई.ई.पी.-प्रशांत दिग्रसकर. यापत्रकार परिषदेत इतर अधिकाऱ्यांमध्ये अपर जिल्हाधिकारी राम गगराणी, मनपा आयुक्त लहुराज माळी आणि उपजिल्हाधिकारी प्रशांत शेळके उपस्थित होते.

………. रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड.

You may also like