नवे महीला तहसिलदार गौण खानिज तस्कराला कसे आवरणार !

महसुल पथकवर होणारे हल्ले चिंतेची बाब….

हदगाव तालुक्यात महसुल विभाग निवडणूक कामात गुतल्याने त्याचा फायदा गौण खनिज चोरांनी घेण्यास सुरुवात केली असुन, जर एखद्या महसुलच्या कर्मचाऱ्यांने या गौणखनिज चोराना पकडले असता ते आपला राजकीय पावर दाखवुन महसुल प्रशासनाला हतबल करित आहेत. असा प्रकार गेल्या आठवड्यात घडला असून, यामध्ये जेव्हा महसुलच्या ञस्त कर्मचा-याने आपल्यावर झालेल्या हल्ल्याची रितसर फिर्याद हदगाव पोलिस स्टेशनला दिली. तेंव्हा प्रभारी पोलिस निरक्षकाने आरोपीची क्रास तक्रार घेवुन हे प्रक्रण रफादफा केल्याची चर्चा सुरु आहे. यामध्ये आर्थिक व्यवहार झाल्यानेच हे गँभीर प्रकरण दडपण्यात आल्याने, महसुल कर्मचा-याचे गौण खनिज चोरी प्रक्रणी माञ खच्चीकरण होत आहे.

अप्रत्यक्षपणे महसुलचे पथक वाळु तस्काराच्या दबावखालीच वावरत आसल्याचे स्पष्ट जानवत असून, हदगाव शहरासह ग्रामीण भागात वाळु व मुरुमाची तस्करी तात्कालिन तहसिलदार याच्या कार्यकाळात जोरात होती. या बाबतीत अनेक जणांनी तात्कालिन तहसिलदार संदीप कुलकर्णी यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. पण त्याचा काही एक उपयोग झाला नव्हता, उलट वाळू तस्करांशी मिलीभगत करून अभय दिल्या गेल्याने शासनाच्या गौण खनिज अधिनियमांना बगल देऊन वाळू दादांनी शासनाला चुना लावत पर्यावरणाचा र्हास केला असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमी व तस्करांच्या दबावाला बाली पड्लेल्याकडून केला जात आहे.

नव्या तहसिलदार कडुन अपेक्षा …

गेल्या आठवड्यातच तहसिलदार म्हणून वंदना निकुब यानी सुञे हाती घेतली आहे. आवैधरित्या गौण खनिज चोरी करणारी एक टोळी हदगाव तालुक्यात कार्यरत आहे. त्यांना अप्रत्यक्षपणे राजकीय पाठबळ मिळत आसल्याने त्याना महसुल प्रशासनाची कोणत्या प्रकारची भिती नसते. केवळ नामञ रायलटी काढुन गौण खनिजची इतञ ठिकाणाहून राजरोसपणे चोरी करण्यात येते. अवैध गौण खनिज बाबतीत नव्या तहसिलदार या तस्करांना कश्या प्रकारे मुसक्या घालतील या बाबतीत जनतेला उतस्कता निर्माण झाली आहे.

…… शे.चाँदपाशा,हदगाव.

You may also like