नांदेड-हजारात निझामुद्दीन दिल्ली -नांदेड मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस सुरु होणार

रेल्वे बोर्डाने दिनांक 7 मार्च 2019 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार हु.सा.नांदेड –हजरत निझामुद्दीन दिल्ली -हु.सा.नांदेड साप्ताहिक मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस दिनांक 19 मार्च 2019 रोजी सुरु होणार आहे. ती पुढील प्रमाणे

  1. गाडी संख्या 12753 हु.सा. नांदेड – ह. निझामुद्दीन दिल्ली साप्ताहिक मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस दिनांक 19 मार्च 2019 रोजी (दर मंगळवारी) सकाळी 08.00 वाजता हु. सा. नांदेड रेल्वे स्थानकातून सुटेल आणि दुसर्या दिवशी दुपारी 13.00 वाजता ह. निझामुद्दीन रेल्वे स्थानकावर पोहोचेल.
  2. परतीच्या प्रवासात गाडी संख्या 12754 ह. निझामुद्दीन दिल्ली –हु.सा. नांदेड साप्ताहिक मराठवाडा संपर्क क्रांती एक्स्प्रेस दिनांक 20 मार्च 2019 रोजी ( दर बुधवारी) रात्री 19.50 वाजता सुटेल आणि नांदेड येथे शुक्रवारी सकाळी 01.00 वाजता पोहोचेल.
  3. या गाडीस 15 डब्बे असतील. ज्यात वातानुकुलीत द्वितीय श्रेणी-1 डब्बा, तृतीय वातानुकुलीत -02 डब्बे, तृतीय श्रेणी शय्या -06 डब्बे, 04-सामान्य आणि इतर दोन डब्बे असतील.
  4. हि गाडी परभणी, जालना, औरंगाबाद, मनमाड, जळगाव, भुसावळ, भोपाल, झांसी, आग्रा कांट या स्टेशन ला थांबेल.
  5. गाडीचे वेळापत्रक सोबत जोडले आहे.

You may also like