शहीद जवान राजेमोड यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने आर्थिक मदत

नांदेड येथे गोल्ला गोलेवार यादव समाजाचा राज्यस्तरीय भव्य मेळाव्यात ना. संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी पांडूरणा ता. भोकर येथील वीर जवान मारोती राजेमोड यांच्या कुटुंबियांना पाच लाख रुपयांचा मदत निधी जाहीर केला होता व समाजाच्या मागण्यासाठी मुख्यमत्र्यांसोबत बैठकीचे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता म्हणून तातडीने समाजाचे प्रदेश अध्यक्ष नामदेवराव आयलवाड व राजेमोड कुटुंबीयांना संपर्क करून 7 मार्च रोजी मुंबई येथे बोलावून वीर जवान मारोती कोंडिराम राजेमोड यांच्या कुटुंबियांसाठी शासनाच्या वतीने पाच लाख रुपयांचा मदत निधी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वीर पत्नी प्रभावती राजेमोड यांना देण्यात आला.

मुख्यमंत्र्याच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हा धनादेश देण्यात आला. याप्रसंगी माजी सैनिक कल्याणमंत्री संभाजी पाटील-निलंगेकर, समाजाचे प्रदेश अध्यक्ष नामदेवराव आयलवाड, नांदेड जि. कार्याध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड, सचिव अशोकराव कासराळीकर, मार्गदर्शक जगन्नाथ येईलवाड, एस.टी. गालेवाड, दिगंबरराव मुंगरे, भगवानराव पपुलवाड उपस्थित होते. जिल्ह्यातील पांडुराणा (ता. भोकर) येथील वीर पुत्र मारोती राजेमोड यांचे उधमपूर येथे 17 ऑक्टोंबर 2018 रोजी कर्तव्यावर असताना निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबियांकरिता विशेष बाब म्हणून सैनिक कल्याण विभागाने पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर केली होती. या मदतीचा धनादेश मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी श्रीमती राजेमोड यांच्याकडे सुपुर्द केला. याप्रसंगी राजेमोड यांचे वडील कोंडिराम, आई अनुसयाबाई, सासरे मारोती गोविंदवाड, बालाजी राजेमोड, आनंदा झंपलवाड, शहीद जवानाची मुलगी श्रावणी, मुलगा साईनारायण उपस्थित होते. मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी राजेमोड कुटुंबियांची आस्थेवाईक विचारपूसही केली.

You may also like