तहसीलदारांच्या विनंतीला आदिवासी बांधवांनी दिला नकार

रस्ता केलातरच मतदान…. अन्यथा बहिष्कारांचा निर्णय ठाम…..
तिन तासाच्या चर्चेनंतर तहसीलदार रिकाम्या हाती परतले…।

हिमायतनगर तालुक्यातील वाळकेवाडी अंतर्गत असलेल्या तिन वाडयांना आत्तापर्यंत पक्का तर सोडाच कच्चा रस्ता देखील नसल्यामुळे ग्रामस्थांना हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. रस्ता करण्याची मागणी वारंवार प्रशासनाकडे करुनहि कोणीहि ढुकूंन पाहत नसल्यामुळे पुरुष, महिलासह मुलबाळ घेउन ग्रामस्थांनी सोनारी फाटा येथील राष्ट्रिय मार्गावर दि.१३ मे २०१८ रोजी रस्ता रोको आंदोलन करुन शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. परंत्तू प्रशासनाने आंदोलन कर्त्यांची भेट घेउन रस्ता करण्याचे आश्वासनाचे गाजर दाखवून निघून गेले. त्यामुळे संतापलेल्या गावकर्यांनाही अखेर लोकसभा निवडणुकिवर बहिष्कार टाकण्याचा ईशारा राज्यपालासह जिल्हाधिकारी सबंधितंाना दि.११ फेब्रूवारी रोजी दिला आहे. विस ते पंचविस दिवसानंतर तहसीलदारांनी दि.७ मार्च रोजी तिन्हिहि वाडयांना भेट देउन बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. परंत्तू ग्रामस्थानी रस्ता झाला तरच मतदान…. अन्यथा बहिष्काराचा निर्णय ठामअसा निर्धार व्यक्त केल्याने प्रशासन हतबल झाले आहे.

नांदेड – किनवट राष्ट्रीय महामार्गाच्या दक्षिण बाजूस दुधड वाळकेवाडी ग्रामपंचायत असून, या अंतर्गत असलेल्या धनवेवाडी, वडाचीवाडी, बुरकुलवाडी या तिन वाडया शंभर टक्के आंध आदिवासी वस्ती असलेल्या गावापासुन तिन कि मी अंतरावर तेलंगणा सीमेलगत आहेत. गेल्या अनेक वर्षापासुन वास्तव्य करुन राहत असलेल्या ७०० च्या वर लोकसख्येंच्या या वाडयांना स्वातत्र्य मिळुन ६० वर्षाचा कालावधी पार पडला असला तरी आाप पर्यंत मजबुत तर सोडाच कच्चा रस्ता देखील झालेला नाहि. जंगलाच्या पायथ्याशी द-या खो-यात असलेल्या नागरीकंाना ये – जा करण्यासाठी रस्त्याअभावी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. पावसाळयात तर ग्रामस्थांना दयनिय अवस्थेचा सामना करावा लागत आहे. रस्ता करावा म्हणुन अनेक वर्षापासुन येथील नागरिकांनी जिल्हास्तरापासून ते आमदार, खासदार व मंत्र्यांनाही भेटले. तरी प्रशासनाने या आदिवासी बांधवांची दखल घेतली नसल्यामुळे अखेर भोकर हिमायतनगर या रार्ष्टिय मार्गावरील सोनारीफाटा येथे ग्रामस्थांनी आपल्या मुलाबाळासह १३ मे २०१८ रेाजी रखरखत्या उन्हात रस्ता रोको आंदोलन करुन तब्बल तिन तास वाहतुक बंदच केली होती. अखेर प्रशासनाने आश्वासन दिल्यामुळे आंदोलन कर्त्यांनी संयमबाळगुन प्रशासनास सहवार्य करुन आंदोलन मागे घेतले. यास दहा महिने झाले तरी कामाला सुरुवात होत नसल्यामुळे ग्रामस्थांनी राज्यपाल, मुख्यमंत्री, जिल्हाधिका-यासह सबंधितांना निवेदन देउन लोकसभा निवडणुकि पुर्वी रस्ता करा अन्यथा निवडणकिवर बहिष्कार टाकण्याचा ईशारा दि.११ फेब्रूवारी रोजी निवेदनाव्दारे दिला आहे.

त्यामुळे या भागातील पुढा-यांनी काय कर्तबगारी केली हे समजु शकले नसले तरी नव्याने आलेले तहसीलदार जाधव यांनी दि.०७ मार्च रोजी सायंकाळी ५.३० वा धनवेवाडी, वडाचीवाडी, बुरकुलवाडी या तिन्हिहि वाडयांना भेट देउन बहिष्कार मागे घेण्याची विनंती केली. नागरीकंानी निवडणुकि पुर्वी रस्ता झाला तरच मतदान अन्यथा बहिष्काराचा निर्णयावर गावकरी ठामअसल्याचे स्पष्टपणे सांगीतले आहे. त्यामुळे तहसीलदारांनी वरीष्टांना तसा अहवाल देणार असल्याचे सांगीतले असून, लवकरच पुन्हा तिन वाडयांची एक बैठक तहसीलला घेउ असे सांगीतल्यावर ग्रामस्थांनी बैठक तहसीलला किंवा उपविभागीय कार्यालयास घ्या…. या बैठकिस उपविभागीय दंडाधिकारी आले तरच आम्हि बैठकिस येणार असे सांगितले. तहसीलदार, मंडळाधिकारी, तलाठि तब्बल तिन तासानंतर रात्री ८.३० वा परत गेले असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले असून, तहसीलदारांनी केलेली विनन्ती ग्रामस्थांानी ऐकले नसले तरी वर्ष – वर्ष कर्मचारी या वाडयांना भेटत नाहित. तहसीलदारांनी रात्री भेट देउन प्रशासनाच्या वतीने ग्रामस्थांशी चर्चा केली. पुढिल बैठकित काय निर्णय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागुन असले तर सध्या तरी निवडणुकीच्या बहिष्कारावर नागरिक ठाम आहेत.

सात वर्षापासुन रखडलेल्या पहिल्या शाळाखोलीचे बांधकाम सुरु

धनवेवाडी या वाडीला आजपर्यंत शाळेला स्वताची इमारत अथवा शाळा खोली नव्हता. मंदिराजवळील झाडा खाली शाळा भरत असे. पावसाळयात तर शाळेला अनधिकृत सुटिच राहायची. सुदैवाने सन २०११ – २०१२ मध्ये शाळेच्या दोन खोल्या मंजुर झाल्या होत्या. कामकरणा-या गुरुजींनी निधी उचलुन अर्धवट अवस्थेत तब्बल सात वर्षे काम बंद ठेवले. ज्या गुरुजींनी कामापेक्षा जास्तीचा निधी उचलला होता त्यांची बदली सन २०१५ – २०१६ मध्ये झाली. ते कामजैसे थे ठेउन बदलीच्या ठिकाणी गेल्यामुळे काम रखडले होते. अखेर पालकंानी वरीष्टाकडे तक्रार केल्यांनतर २ मार्चपासुन रखडले काम बदलुन गेलेले गुरुजी करीत असल्याचे व्रत आहे. निधि हडपण्याचा प्रयत्न करणा-या त्या गुरुजीवर कारवाहि करण्याचे धाडस सबंधितंानी दाखविले नसल्यामुळे कुठेतरी पाणी मुरल्याची चर्चा आहे. अखेर जागरुक पालकामुळे मुलांना शाळा खोली काही दिवसात भेटणार असून, स्वातंत्र्यांनतर या गावातील हि पहिली शाळा असंणार आहे.

अनिल मादसवार, हिमायतनगर, नांदेड.

You may also like