जाहुर परिसरातील नागरिक जिव मुठीत धरून विहीरीतुन पाणी काढत आहेत

मुखेड तालुका दुष्काळग्रस्त जाहीर….

शासनाच्या दुष्काळग्रस्त उपाययोजना सुविधा अद्यापही कागदोपत्रीच

जाहूर-ऐन मार्च महिन्यातच कुपनलिका आणि सार्वजनिक विहिरींना कोरड पडल्याने पंचायत समिती व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समन्वयाच्या अभावामुळे टंचाईची तीव्रता दिवसेंदिवस वाढत आहे .जाहुर व परिसरातील वस्ती तांडा येथील टॅंकर मजुरी , विहीर अधिग्रहण प्रस्ताव ताटकळले आहेत .यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना दिवसरात्र भटकंती करण्याची वेळ आली आहे .जाहूर , राजूरा , अंबुलगा , उन्द्री , तसेच आसपास चे वस्ती तांडा परिसरातील ग्रामस्थांना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे.शासनाने मुखेड तालुका दुष्काळ ग्रस्त जाहीर केला असूनही दुष्काळ ग्रस्ताच्या उपाय योजना अजुनही कागदावरच आहेत.

येथील नागरिक मोटार सायकलवर, बैलगाडीच्या सहाय्याने ड्रम-ड्रम पाणी शेतातील विहिरीवरून आणत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. मार्च मध्ये ही परिस्तिथी तर एप्रिल मे महिन्यात येथे जलसंकट रौद्ररुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात असल्याने जि .प .पंचायत समिती ,तालुक्यातील लोकप्रतिनिधी शासन , प्रशासनाने तात्काळ पाणीटंचाई संदर्भात योग्य पाऊल उचलण्याची गरज आहे.जाहूर , राजूरा , अंबुलगा , उन्द्री , तसेच आसपास चे वस्ती तांडा परिसरातील रहिवाशांना सध्या जल समस्येचा सामना करावा लागत आहे.अद्यापही जि .प च्या पाणीपुरवठा विभागाने पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर ची सुविधा उपलब्ध करून दिलेली नाही.पाणीटंचाईची तीव्र समस्या तालुक्यात असतानाही लोकप्रतिनिधी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची मोर्चे बांधणीत व्यस्त दिसून येत आहे .या निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनिधीकडून केवळ आश्वासनाचा कोरडा पाऊस पहायला मिळत आहे .जाहुर, राजूरा , अंबुलगा , उन्द्री , तसेच आसपास चे वस्ती तांडा परिसरातील नागरिक सांगतात कि पुर्वी 20 ते 30 फुट खोलीवर खोदकामादरम्यान येथे पाणी लागत असे. पण आता मात्र भुगर्भातील जलपातळी खूपच खाली गेल्याचे 500 ते 700 फूट बोअर पाडूनही येथे पाण्याचा काही पत्ता नाही.

यामुळे गावातील बहूतांश विहिरी तळ दाखवत असून काही विहिरींना कोरड पडली आहे. भविष्यातील जलसंकट लक्षात घेऊन या भागात शासकीय नियमांना फाटा देत बोअर केली जात आहे.इतकेच नव्हे तर काही बोअर करणाऱ्यांकडून सध्या नागरिकांच्या अडचणीचा फायदाच घेतल्या जात असल्याचे दिसून येते. विहिरीला कोरड पडल्याने काहींना शेतातील विहिरींचा आधार घ्यावा लागत आहे. ज्यांची बोअर करण्याची आर्थिक स्थिती नाही अशांना तीन ते चार किमी अंतरावरून बैलगाडीवर मोठाले ड्रम लादून त्याद्वारे शेतातील विहिरींवरून पाणी आणावे लागत आहे. . ऐन मार्च महिन्यात ही परिस्थिती असून एप्रिल मे मध्ये ही परिस्थिती विदारक रुप धारण करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जाहुर, राजूरा , अंबुलगा , उन्द्री , तसेच आसपास चे वस्ती तांडा परिसरातील सार्वजनिक विहिरीला कोरड पडल्याने विहीरीतील पाणी काढण्यासाठी जिव मुठीत धरून पाणी काढावे लागत आहे .गावातील विहीर तळ गाटल्याने शेतातील विहिरीचा आधार घ्यावा लागत आहे. बैलगाडीवर ड्रम लादून त्याद्वारे पाणी आणावे लागत आहे.
पाणीटंचाई संदर्भात

प्रशासनाबरोबरच राजकीय उदासीनता

एकीकडे निसर्गाच्या अवकृपेशी सामना करीत असताना प्रशासकीय स्तरातून मदत मिळण्याची अपेक्षा जाहूर व परिसरातील गावातील जनतेतुन केली जात आहे .मात्र राजकीय दबाव नसल्याने प्रशासन सुध्दा सुस्तावले आहे .नव्याने नियुक्त झालेले तहसीलदार व गटविकास अधिकारी , उपविभागीय अधिकारी अजूनही टंचाई बाबत काय उपाय योजना कराव्यात याचे नियोजन केले नसल्याचे दिसून येत आहे .पंचायत समिती व तहसील कार्यालयाकडून आम्ही जिल्हा स्तरावर प्रस्ताव सादर केले असून मंजुरीसाठी जिल्हास्तरावर प्रलंबित आहेत .असे कारण देत आपली जबाबदारी झटकत असल्याचे सध्यातरी दिसत आहे .शासन प्रशासनाच्या टळवा -टळवीत सध्या जनतेचे मात्र हाल होत आहेत. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ सूचना द्याव्यात अशी मागणी केली जात आहे .

You may also like