अशोक चव्हाणांच्या बालेकिल्याला खिंडार पाडणारा भारतीय जनता पार्टीचा मास लिडर कोण?

अशोक चव्हाणांच्या बालेकिल्याला सुरूंग लावण्याच्या स्वप्नात विविध प्रकारचे चित्र विचित्र रंग भरून मानसिक इंद्रधनुष्य तयार करणाऱ्या भारतीय जनता पार्टीने लोकसभा निवडणुकीत आपला उमेदवार कोणता या बद्दल कांही तरी विचार केला आहे काय ? हा प्रश्न कायम आहे. कोणता तरी व्यक्ती ज्याला जनतेचा आधार आहे असा उमेदवार भाजपकडे कोण आहे? याची तपासणी भारतीय जनता पार्टीने निवडणूकीतील अर्ज भरण्या अगोदर करण्याची गरज आहे.

माजी केंद्रीय मंत्री डॉ.शंकरराव चव्हाण यांचा वारसा प्राप्त करून राजकीय क्षेत्रात आपले पदार्पण करणाऱ्या अशोक चव्हाण यांनी आपल्या जीवनात अनेक चढउतार पाहिले हे चढ उतार कोठे त्यांना आनंद देणारे होते तर कोठे त्यांना भरपूर दु:ख देणारे होते. पण या सर्वांमधून मार्गक्रमण करत असतांना आजही नांदेड जिल्ह्यात सर्वत्र अशोक चव्हाणांच्या नावाची तुतारी वाजण्याची किमया कोणत्याच स्थितीत बंद तर सोडा पण कोठेच कमी झाली नाही. अशोक चव्हाणांच्यासोबत शंकरराव चव्हाणांच्या साक्षीने राजकारणात पदार्पण करणाऱ्या कांही जणांनी आम्ही सर्व एकाच शाळेचे विद्यार्थी आहोत. कोणी 4 थीत तर कोणी 5वीत एवढाच कांहीसा फरक असल्याचे वक्तव्य केले. जीवनातील नियम आहे. एकच आई दोन जुळ्या बालकांना जन्म देते तेंव्हा कांही सेंकदांचा फरक असतो पण पहिल्या जन्मणाऱ्या बालकालाच मोठा असल्याचा मान मिळतो. एक वर्षाचा फरक तर मोठा आहे.

नांदेड जिल्ह्यात असंख्य नेते मंडळी होती. त्या सर्व नेतेमंडळीमधील पुत्रांचा अभ्यास केला तर खा.अशोक चव्हाण नेहमीच सरस ठरतात. ज्या माणसाकडे फिरायला साधी लुना नव्हती. ते नगरसेवक झाल्यावर वातानुकूलीत गाडीत फिरतात अशोक चव्हाण तर चांदीचा चमचा तोंडात घेऊन जन्मलेले बाळ आहे आणि त्यांची बरोबरी आणि त्यांना मतदार संघातून कडेलोट करण्याची भाषा करणाऱ्यांना थोडीसी सुध्दा वाटली नाही. ऐककाळी नांदेड जिल्ह्यातील 9 आमदारांपैकी 8 आमदारांनी एकत्र होवून अशोक चव्हाणचा विरोध केला होता. त्या विरोधात सुध्दा अशोक चव्हाणच जिंकले होते. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री झाले तेंव्हा पहिल्या दिवशी रात्रीपर्यंत नांदेडच्या एका नेत्याने आपल्या समर्थकांना उद्या माजी शपथविधी आहे. सर्वजण मुंबईला या असा संदेश दिला होता. त्या नेत्याचे असंख्य समर्थक नांदेड ते मुंबई जाणाऱ्या गाडीमध्ये प्रवास करून छत्रपती टर्निमिन्स मुंबई येथे उतारताच त्यांना ही खबर मिळाली की, आपल्या नेत्याचे नाव कटले आणि अशोक चव्हाणच दुसऱ्या टर्ममध्ये परिवहन मंत्री आणि नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री होणार आहेत. तेंव्हा मात्र त्या सर्व समर्थकांनी आपल्या डोळ्यातील आश्रु लपवत आपल्या ओळांवर हासू आणत अशोक चव्हाणांच्या शपथग्रहण समारंभात हजेरी लावली. त्यानंतर जवळपास 3 वर्षाचा कालखंड गेला तेंव्हा प्रत्येक डी.पी.डी.सी. मिटिंगमध्ये अशोक चव्हाण आणि जिल्हाधिकारी यांना धारेवर धरण्याचे काम 8 आमदारांनी केले. पण तेंव्हा सुध्दा अशोक चव्हाणांनी स्वत:वर नियंत्रण राखत तो काळ यशस्वीरित्या पुर्ण केला. आणि नशीबाने साथ दिली आणि ते मुख्यमंत्री झाले.

जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद आणि महानगरपालिका तसेच विविध नगरपालिका, नगरपरिषदा हा सुध्दा एक मोठा आपल्या ताकदीचा संग्रह दाखविण्याचा उपाय आहे. आजही जिल्ह्यात बहुतांश जागी कॉंगे्रसची सत्ता आहे. नांदेड जिल्ह्यातील एक तालुका वगवळा तर अशोक चव्हाणांना मागे पाडण्यात कोणालाच कधी यश आले नाही आणि आता पुन्हा लोकसभा निवडणुक जाहीर होण्यापुर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यंदाच्या निवडणुकीत अशोक चव्हाणांचा गड पाडणार असे जाहीर वक्तव्य केले. मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याला कोणाचा विरोध असण्याचे काही कारण नाही. पण त्यांच्याकडे नांदेड जिल्ह्यात अशोक चव्हाणांना तोड देईल असा उमेदवार कोणता याचा शोध खुद भारतीय जनता पार्टीला घेण्याची गरज आहे. कारण मास लिडर असणारे एकही व्यक्तीमत्व भारतीय जनता पार्टीकडे उपलब्ध असल्याचे दिसत नाही आणि मग अशा परिस्थिती अशोक चव्हाणांना टक्कर देणार कोण? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी भारतीय जनता पार्टीने लोकसभेचा निवडणुक अर्ज भरण्याच्या अगोदर अत्यंत गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे.

…..रामप्रसाद खंडेलवाल, नांदेड.

You may also like