नांदेड लोकसभेची उमेदवारी डॉ. धनाजीराव देशमुख यांना दया – सोनटक्के

नांदेडच्या शिष्टमंडळाची वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्र्यासोबत सकारात्मक चर्चा !

महाराष्ट्रात बहुचर्चित समजली जाणारी लोकसभा म्हणजे नांदेड लोकसभा असून नांदेड ची लोकसभा मागील तीन वेळेस लढविलेले स्वच्छ प्रतिमेची निष्ठावंत भाजपा नेते डॉ. धनाजीराव देशमुख यांना नांदेड लोकसभेची उमेदवारी दयावी अशी आग्रहाची भूमिका मुखेड भाजपाचे संस्थापक अध्यक्ष तथा भाजपाचे जेष्ठ नेते त्र्यंबक सोनटक्के यांनी व नांदेड येथून गेलेल्या एका शिष्टमंडळाने मुंबई येथे वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची दि. 13 रोजी भेट घेऊन मागणी केली आहे.

डॉ. धनाजीराव देशमुख हे भाजपाच्या पडतीच्या काळात सोबत राहिले असून त्यांनी वेळोवेळी आपली चुनूक दाखवून नेतृत्व सिध्द केले आहे यामुळे नांदेड जिल्हयात भाजपाला अच्छे दिन आणण्यासाठी निष्ठावंत डॉ. धनाजीराव देशमुख यांना उमेदवारी देणे गरजेचे असून सपुर्ण ताकदनीशी नांदेड लोकसभा भाजपाच्या हाती आणण्याचे काम मा. नरेंद्र मोदी यांच्या काळात करण्यात येईल असे दुरध्वनीव्दारे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सोनटक्के म्हणाले.

डॉ. देशमुख यांना उमेदवारी मिळविण्यासाठी नांदेडचे शिष्ठमंडळ नागपुर येथे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी, मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस व प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची भेट घेतली असल्याचे कळते त्यामुळे कॉग्रेसला टक्कर देण्यासाठी नांदेड मधून कोण ? असा सवाल आता जनतेत असून भाजपाकडून आ. राम पाटील रातोळीकर, आ. प्रताप पाटील चिखलीकर, डॉ. धनाजीराव देशमुख, डॉ. संतुक हंबर्डे यांच्यासह एका महंताचे नाव सुध्दा चर्चेत असल्याचे कळते. मुंबई येथे वर्षा बंगल्यावर गेलेल्या शिष्टमंडळात सोबत डॉ धनाजीराव देशमुख , मुदखेडचे माजी नगराध्यक्ष राम चौधरी, त्र्यंबक सोनटक्के, केरु सावकार बिलोली,राम केंद्रे, जनार्धन ठाकुर, प्रताप पावडे, बाळासाहेब बोकारे, दिपक पावडे,उबलनाथ यादव, विजय गंभीरे, अनिल हजारे, अभिलाष नाईक आदी भाजपा पदाधिकारी उपस्थित असल्याचे भाजप नेते त्र्यंबक सोनटक्के दुरध्वनीव्दारे सांगितले.

……..ज्ञानेश्वर डोईजड, मुखेड .

You may also like