साहेब… कार्यकर्ते सेल्फी काढतात लोकांसमोर जात नाहीत – भीमराव पाटील हळदवकर

साहेब एकही तालुकाध्यक्ष कार्यकर्त्यांसाठी पोलीस ठाण्यात फोन करत नाहीत तुमच्या सोबत सेल्फी काढतात. पक्षात गटबाजी खूप आहे. पक्ष अशानं कसा वाढेल तुम्हीच यावर तोडगा काढा परिस्थिती खूप बिकट आहे. वातावरण आपणास अनुकूल राहिलच याची गॉरंटी नाही अशा रोखठोक शब्दात हळदव’चे माजी सरपंच भीमराव पाटील शिंदे यांनी कॉग्रेस प्रदेशाध्यक्ष यांच्या समक्ष आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली.

नांदेड येथे मागील आठवड्यात कॉग्रेस कार्यकर्त्याची बैठक पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. जिल्ह्यातील सर्व पक्षाचे आजी माजी आमदार जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. माजी सरपंच भीमराव पाटील शिंदे हळदवकर हे माजी आ. रोहिदास चव्हाण यांचे विश्वासू निष्ठावंत कार्यकर्ते रोखठोक बोलणारे.. ओठात अन पोटात एकच.. राग आला तरी चालेल पण वास्तव परिस्थिती सांगणारा हाडाचा कार्यकर्ता. नांदेडच्या कॉग्रेस कार्यकर्ता बैठकीत भीमराव शिंदे यांना दोन मिनिटे बोलण्याची संधी मिळाली त्याचे त्यांनी सोने केले. कॉग्रेस पक्षात काय स्थिती आहे. याचे वास्तव प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांच्या समक्ष सांगितले. साहेब, हे सेल्फी पुरते काही ज आहेत पक्षाचे काम निष्ठेने करतच नाहीत.

गटबाजी आहे. ती तुम्हीच संपवू शकता आज परिस्थिती खूपच वाईट आहे असे खरे सांगिताच उपस्थितीतांत टाळ्यांचा कडकडाट झाला. साहेबांनी पुन्हा बोला म्हणत ऐकून घेतले. दोन ऐवजी दहा मिनिटे त्यांनी मनमोकळे पणांनी कॉग्रेस पक्षाची अवस्था मांडली. प्रदेशाध्यक्षांनी भीमराव शिंदे या गावपातळीवरच्या रोखठोक सांगणाऱ्या कार्यकर्त्यांची नोंद घेतली हे भाषण त्या बैठकीत वास्तवावर बोट ठेवणारे होते अशा प्रतिक्रिया उमटल्या.

You may also like