जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान महिलांचा गौरव सोहळा १० मार्चला

विविध क्षेत्रातील १५ महिलांचा होणार सन्मान
महिलांच्या भव्य कविसंमेलनाचेही आयोजन

प्रबोधन, मनोरंजन आणि परिवर्तन हे ब्रीद घेऊन महाराष्ट्रभर विविध सामाजिक, शैक्षणिक व साहित्य विषयक उपक्रम राबविणारे अक्षरोदय साहित्य मंडळ, मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठान उमरी तसेच मैत्री युवा विकास प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणार्‍या कर्तृत्ववान महिलांचा गौरव १० मार्च रोजी करण्यात येणार असल्याची माहिती अक्षरोदय साहित्य मंडळाचे मराठवाडा प्रांताध्यक्ष गंगाधर ढवळे यांनी दिली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येथील स्त्रीवादी चळवळीच्या भाष्यकार पंचफुला वाघमारे, प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध लेखिका प्रा. संध्या रंगारी, डॉ. करुणा जमदाडे, डॉ. द्रौपदी पंदीलवाड, शिक्षण विस्तार अधिकारी सुनंदा भद्रे यांची उपस्थिती राहणार आहे.

शहरातील पीपल्स कॉलेजच्या नरहर कुरुंदकर सभागृहात सोहळा संपन्न होणार असून अक्षरोदय महिला गौरव पुरस्काराने सुनंदा पाटील (ठाणे), आणि डॉ. प्रतिभा जाधव (नाशिक), सविता चंद्रे (यवतमाळ), मंगला रोकडे (धुळे), डॉ. सुजाता आडे (धुळे), कलावती राऊत (परभणी), रत्नमाला व्यवहारे (नांदेड), स्वाती कान्हेगांवकर (नांदेड), कांता कवळे (माहूर), कल्याणी डाकोरे (धर्माबाद) यांना तर मातोश्री भागाबाई डोंगरे प्रतिष्ठानच्यावतीने सुनीता शेळके (जालना), डॉ. पद्मा मंदकुटे (माहूर), निर्मला ठोंबरे (नाशिक), लताताई शिंदे (नांदेड) आणि रेखा पंडीत (नांदेड) यांना सन्मानीत करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरुप मानाचा फेटा, शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह व ग्रंथभेट असे असणार आहे. त्यानंतर ऍड. सावित्री दमकोंडवार यांच्या अध्यक्षतेखाली होणार्‍या महिलांच्या भव्य कविसंमेलनात सौ. उषाताई ठाकूर, माया तळणकर, छाया कांबळे, वंदना मघाडे, सविता सोनकांबळे, सुरेखा महादसवाड, सिंधुताई दहीफळे, प्रज्ञा आपेगांवकर, वंदना घुले, वसुंधरा सुत्रावे, अनिता जाधव, लताताई शिंदे, प्रेरणा कंधारे, ज्योती गायकवाड, सारीका बकवाड, शैलजा कारंडे, मनिषा यनगुलवार, गोदावरी गायकवाड, विजया गायकवाड, कांचन वीर, अर्चना खोब्रागडे, माया भद्रे, कालिंदी वाघमारे, सुश्मिता देशमुख, संध्या रायठक, अरुणा गर्जे आदी मान्यवर कवयित्री सहभागी होणार आहेत.

पुरस्काराचे हे तिसरे वर्ष असून १० मार्च रोजी सकाळी १० वाजता कार्यक्रमाला सुरुवात होणार असून परिसरातील सर्व रसिक, प्रेक्षकांनी व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन सिंधुताई दहीफळे, उषाताई ठाकूर, अनुराधा हवेलीकर, माया तळणकर, माणिक नागवे, दिगांबर भाडेकर, ऍड. प्रशांत हिंगोले, सदानंद सपकाळे, अनुरत्न वाघमारे, पांडूरंग कोकुलवार, कैलास धुतराज, मारोती मुंडे, चंद्रकांत चव्हाण, शरदचंद्र हयातनगरकर, शैलेश कवठेकर, गंगाधर ढवळे, नागोराव डोंगरे, अशोक मगरे, विठ्ठलराव जोंधळे, एन.सी. भंडारे, थोरात बंधु, प्रशांत गवळे, गजानन देवकर यांच्यासह पंकज कांबळे, श्याम पुणेकर, सुमेध घुगरे, डॉ. माधव कुद्रे, जीवन मांजरमकर, आनंद चिंचोले, विलास हानवते आदींनी केले आहे.

You may also like