पेटीएम मनीने ‘इन्व्हेस्टमेंट पॅक’ लॉन्च केले

म्युच्युअल फंडातील योग्य गुंतवणुकीसाठी गुंतवणूकदारांना मोफत मार्गदर्शन करणार

म्यूचुअल फंड गुंतवणुकीसाठीचा भारताचा सर्वात मोठा मंच पेटीएम मनीने आज “इन्व्हेस्टमेंट पॅक” लॉन्च केल्याचे जाहिर केले. हे त्यांचे पहिले सल्ला देणारे उत्पादन आहे, जे प्रत्येक गुंतवणूकदाराच्या विशिष्ट रिस्क प्रोफाइलच्या आधारे म्यूचुअल फंड योजनांचे क्युरेटेड इन्व्हेस्टमेंट पोर्टफोलियो ऑफर करते.

पेटीएम मनीचे इन्व्हेस्टमेंट पॅक हे म्यूचुअल फंड योजनांचे कस्टमाइझ केलेले पोर्टफोलियो आहेत, जे कंपनीच्या इन-हाऊस सल्लागार टीमने तयार केले आहेत. जे सर्व प्रकारच्या गुंतवणूकदारांच्या गरजांनुसार मदत करते. प्रत्येक पॅक हे नियत रिस्क प्रोफाइलसाठी आहे आणि त्यांचे इक्विटी व डेट म्यूचुअल फंड चे असेट अलोकेशन वेगवेगळे आहे, जे गुंतवणूकदाराच्या रिस्क घेण्याच्या क्षमतेनुसार असते.

पेटीएम मनीचे पूर्ण वेळ संचालक प्रवीण जाधव म्हणाले, “पेटीएम मनी बाबत आमचा फोकस नेहमी म्यूचुअल फंड उद्योगात वृद्धीशील गुंतवणूकदारांची भर घालण्यावर असतो. आम्ही आमच्या गुंतवणूकदारांना अगदी सुलभ एसआयपी व्यवस्थापनासह एक सोपी आणि निर्विघ्न गुंतवणूक सेवा देतो,पण प्रत्येक नवीन गुंतवणूकदाराचा एक प्रश्न असतो की,“मी कुठे गुंतवणूक करावी?” “इन्व्हेस्टमेंट पॅक” च्या साहाय्याने आम्ही कस्टमाइझ्ड अड्व्हाइझरी पोर्टफोलिओ ऑफर करून ही दरी भरून काढू इच्छित आहोत. तसेच पेटीएम मनीवर म्यूचुअल फंडमध्ये पहिल्यांदा गुंतवणूक करणा-यांसाठी गुंतवणूक सुलभ करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

ही “इन्व्हेस्टमेंट पॅक” रिस्क प्रोफाइल मूल्यांकनासह पेटीएम मनीवरील सर्व यूझर्ससाठी संपूर्णपणे निःशुल्क देण्यात आली आहेत. गुंतवणूकदार एसआयपी आणि एकरकमी या अडोणही पद्धतीने गुंतवणूक करू शकतात. एका नमुनेदार इन्व्हेस्टमेंट पॅक मध्ये ३-५ म्यूचुअल फंड स्कीम असतात तसेच यूझरच्या स्वतःच्या रिस्क प्रोफाइलला अनुसरून डेट-इक्विटीचे असेट अलोकेशन असते.

You may also like