शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांनी खाजगी प्रॅक्टिस बंद करावी

माधव देवसरकर यांची मागणी

नांदेड जिल्ह्यातील सर्वच वैद्यकीय अधिकारी शासकीय सेवेत कार्यरत असतानाही स्वत:च्या मोठमोठ्या रूग्णालयात सर्रास खाजगी प्रॅक्टिस करीत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या तसेच शासकीय रूग्णालयाकडे दुर्लक्ष होत असून गोरगरीब जनतेचे हाल होत आहेत. अशा डॉक्टरांवर तातडीने कारवाई करून त्यांना निलंबित करावे अथवा त्यांची खाजगी प्रॅक्टिस बंद करावी. जेणे करून मनपाच्या व शासकीय रूग्णालयातील गरजू रूग्णांना याचा फायदा होईल, असे न झाल्यास स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संबंधित डॉक्टरांच्या विरोधात आंदोलन छेडेल या आशयाचे निवेदन मनपा आयुक्त व अधिष्ठाता, शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय यांना माधव पाटील देवसरकर यांनी दिले.

तसेच नांदेड शहरातील डॉक्टर लेन भागात व काही रूग्णालय धारकांनी आपल्या रूग्णालयात पार्किंगची व्यवस्था न ठेवल्यामुळे रहदारीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे अशा रूग्णालयांवर आणि अनाधिकृत बांधकाम असणाऱ्या रूग्णालयांवर त्वरित मनपाच्या वतीने हातोडा मारावा, अशी मागणीही केली आहे. यावेळी स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर, प्रदेश संघटक विलास पाटील इंगळे, प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत मुळे, प्रदेश कार्यकरिणी सदस्य मंगेश पाटील कदम, जिल्हाध्यक्ष उत्तर सुनील पाटील कदम, जिल्हाध्यक्ष ग्रा. संतोष माने पाटील, वि.आ. जिल्हाध्यक्ष सदा पाटील पुयड़, तालुकाध्यक्ष नवनाथ जोगदंड़, मुखड़े ता. अध्यक्ष वैभव पाटील राजूरकर, देगलूर ता. अध्यक्ष शशांक पाटील, हदगाव ता. अध्यक्ष शिवाजी जाधव, गजानन देगलूरकर, योगेश जांभळीकर, महेश जाधव यांची उपस्थिती होती.

You may also like