‘हवामान बदल आणि जैव साधनसंपदा व्यवस्थापन’ यावर

स्वारातीम विद्यापीठात राष्ट्रीय चर्चासत्र

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि विद्यापीठ अनुदान आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने दि.१८ व दि.१९ मार्च २०१९ रोजी राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून ‘हवामान बदल आणि जैव साधनसंपदा व्यवस्थापन’ या विषयावर हे राष्ट्रीय चर्चासत्र भूशास्त्र संकुलामध्ये संपन्न होणार आहे.

या चर्चासत्रासाठी देशातील विविध राज्यातून सुमारे २०० अभ्यासक, संशोधक आणि अध्यापक येणार आहेत. निरंतर विकास, इको-फ्रेंडली तंत्रज्ञान, स्थानिक आणि जागतिक हवामान बदल, जैवविविधता आणि त्याचे बदलते स्वरूप इत्यादी विषयातील संशोधनात्मक कार्यावर सखोल चर्चा होणार आहे.

प्रो.शंकर मूर्ती, प्रो.एस.गंगाधरराव, प्रो.प्रवीण सप्तर्षी, प्रो.एम.बी. मुळे, प्रो.के.एस.कृष्णा, प्रो.अंजी रेड्डी, प्रो.राजमणी, प्रो.जयंत चापला आदी देशातील अनेक मान्यवर विषयतज्ज्ञ म्हणून या चर्चासत्रामध्ये उपस्थित राहणार आहेत. तसेच त्यांची मार्गदर्शनपर व्याख्याने होणार आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.उद्धव भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली भूशास्त्र संकुलाचे संचालक प्रो.के.विजयकुमार आणि संकुलातील सर्व प्राध्यापक चर्चासत्राच्या सुयोग्य नियोजनासाठी परिश्रम घेत आहेत. या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन, चर्चासत्राचे समन्वयक डॉ.अर्जुन भोसले आणि सचिव दिपाली साबळे यांनी केले आहे.

You may also like