चाहुल होळीची…जंगलात रस्त्याच्या कडेला

फेब्रुवारी च्या सुरवाती पासुन पळसफुले दिसु लागतात, ते एप्रिलच्या शेवटपर्यंत . मराठवाड़ा आणी विदर्भातील जंगल ही या वर्षीही Flame oF Forest या ज्वालाफुलांनी धगधगून उठली आहेत … सालाबादा प्रमाणे मी यंदाही पळस फोटोग्राफी करण्याचे सोडले नाही पळस आणी पळस फुलाबद्दल नवनविन माहिती गोळा करताना झारखंडचं राज्यफूल म्हुनुन ओळखल्या जानार पलाश ( पळस फुल) हे भारतात अनेक राज्यांत आढळते. देशी भाषांमध्ये त्याची तब्बल सत्तर 70 नावं आढळतात…ती अशी…

अग्निदमनक, कनक, कमलासन, काष्ठद्रु, किंचन, किंजुल, किरूमिस्तरू, किर्मि, किंशुक, कृमिघ्न, केसू, क्षारश्रेष्ठ, खाकरा, गुल पलास, छेवला, जटिला, टेसू, ढाक, तेल मोदुग, त्रिपत्रक, त्रिपर्ण, दमन, दाँवना, दीर्घपत्री, देवशेखर, दौना, द्रोण, परास, पलंकष, पलाश, पलाशक, पळस, पांगोंग पाँडर, पापड़ा, पीत चोंप, पुंडरौक, पूतद्रु, पूतुदारु, ब्रह्मजटी, ब्रह्मद्रुम, ब्रह्मपादप, ब्रह्मवृक्ष, ब्रह्मोपनेता, मदनक, मरुत्तक, मातुकाटेट्टु, मुनि पुत्रक, मुरक्कच्यूम, मोडूगा, यज्ञिक, याज्ञिक, यूप्य, रक्तपुष्प, राजादन, लाक्षातरु, वक्रपुष्पक, वातपोथक, वानप्रस्थ्य, विनीत, विपर्णक, विप्रप्रिय, श्याम, साधक, साधु, सुपर्णी, सुभीरक, सुभीरव, स्थूलपत्र, हस्तिकर्ण. अजूनही काही असतील, आपल्या कडे नादेंड जिल्ह्याचच उदाहरण द्यायच झाल्यास अनेक गावाच्या नावात आणी आडनावात पळस शब्द येतो तो आमच्या स्व, सुभाष पाटलाच गाव पळसा हदगाव जवळच प्रसिद्ध गाव यावरूणच पळसेकर आडनाव ही आपल्या भागात प्रसिद्ध आहे ,

You may also like