विभागीय रेल्वे कार्यालयाचा पाणी पुरवठा खंडीत

9.32 कोटी कराची थकबाकी

नांदेड वाघाळा महानगपालिकेने 9.32 कोटी रुपयांच्या थकबाकी करासाठी दक्षीण मध्य रेल्वेच्या विभागीय कार्यालयाचा पाणी पुरवठा खंडीत केला आहे.

नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेने पाठविलेल्या प्रेसनोट प्रमाणे नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका नांदेड हद्दीतील दक्षीण मध्य रेल्वेच्या नांदेड रेल्वे स्थानक, माळटेकडी रेल्वे स्थानक आणि दक्षीण मध्य रेल्वे कार्यालयाला विविध सोयी सुविधा पुरवते त्यात सेवा करापोटी व पाण्याच्या करापोटी 9.32 कोटी रुपये रेल्वे विभागाकडे थकले आहेत. यासाठी वारंवार पाठपुरवा करून सुध्दा रेल्वे विभागाने पैसे भरले नाहीत. त्यामुळे मनपा आयुक्त लहुराज माळी यांच्या मार्गदर्शनात उपायुक्त अजितपालसिंघ संधू यांच्या नियंत्रणात सहाय्यक आयुक्त सदाशिव पतंगे, मिर्झा फरतउल्ला बेग, कुमार कुलकर्णी, सुधीर इंगोले, विलास पांचाळ, सहाय्यक आयुक्त राजेश चव्हाण, कनिष्ठ अभियंता बोधनकर, करनिरिक्षक बळीराम एंगड, साहेबराव ढगे, वसुली लिपीक राजू जोरवर, साधूल्ला खान यांच्या मार्फत रेल्वे विभागीय कार्यालयाचा पाणी पुरवठा आज 14 मार्च 2019 रोजी खंडीत करण्यात आला आहे.

You may also like