इ.व्हि.एम. मतदान मशीन मध्ये शंका घेण्या सारखे काहीच नाही

उपविभागीय आधिकारी महेश वडदकर यांची माहिती

निवडणुकीत मतदार हा केंद्र बिंदु मानल्या जातो या करिता हदगाव व हिमायतनगर तालुक्यात मोठ्या प्रमाणात मतदार नोदणी झालेली आहे. इ. व्हि.एम .मतदान मशीनमध्ये शंका घेण्यासारखे काहीच नाही. कारण निवडणूक आयोगाने वेळोवेळी प्रत्याक्षित दाखवु शंकेचे निरासन केले आहे. अशी माहीती सहाय्यक निवडणूक आधिकारी तथा उपविभागीय अधिकारी महेश वडदकर यानी दिली.

ते २०१९ च्या लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर प्रथमच तहसिल कार्यालयच्या दालनात आयोजित केलेल्या पञकार परिषेदत दिली. आधिक माहीती देताना त्यांनी सागितले कि निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आँनलाईन तक्रारी करिता अँपची निर्मिती केली असून, याबाबतची माहीती सुद्धा दिली. निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होताच स्थानिक निवडणूक यंञणा कामाला लागली आहे. विविध जबाबदाऱ्या महसुल विभागाच्या आधिकारी कर्मचारी याना देण्यात आलेल्या असुन, मिटींगद्वरे निवडणुकीच कामा करिता त्यांच्या सेवा अधिग्रहीत करण्यात आल्या आहेत. हिगोली लोकसभामध्ये सहा तालुके आहेत.

तहसिलदार, न.पा.चे मुख्यआधिकारी, पोलीस निरक्षक गैरहजर

लोकसभा पार्श्वभूमीवर प्रथमच पञकारा परिषद बोलविण्यात आली होती. प्रथम बैठकीत विविध राजकीय पक्षाच्या अध्यक्ष तथा पदाधिका-याची बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीला तहसिलदार न.पा चे मुख्यधिकारी व हदगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरक्षक गैरहजर दिसुन आले. लगेच उपविभागीय आधिकारी यानी पञकार परिषदेत निवडणूक संबधी माहीती दिली. नवे मतदारांची संख्या किती वाढली, महीलांची संख्या पुरुषा पेक्षा वाढली का..? याची माहीती स्थानीक कार्यालयच्या मिडीया सेटरला पञकारा़ना देण्याच्या सुचना केल्या होत्या. पण स्थानिक निवडणूक विभागाच्या मिडीया सेटरने वारंवार विचारुनही माहीती दिली नाही.

यावरुन मिडीया सेंटरला सक्रिय करने अवश्यक असल्याचे दिसुन आले. या पञकार परिषदेला नव्यानेच रुजु झालेल्या नव्या महिला तहसिलदार हजर पाहीजे होत्या. त्यापण दिसुन आलेल्या नाहीत शहरात अनेक ठिकाणी निवडणुकीच्या कामात न.पा.चे मुख्यआधिरी हे कामात गुँगुल्याने त्यांच्याकडे तहसिल कार्यालयचा पुरवठा विभाग असल्याने ते नेहमी कामात व्यस्त असतात. परिणामी शहरात प्रचंड प्रमाणात बेकायदा पक्के बाधकाम, वाढते अतिक्रमण, कोट्यवधी रुपयाची होत आसलेली विकासाच्या कामावर त्यांचे दुर्लक्ष होत असल्यामुळे प्रचंड प्रमाणात बोगस काम होत असल्याच्या तक्रारी होत आहेत. अशीच परिस्थिती पोलिस स्टेशनची असुन, नव्यानेच रुजु झालेले नविन पोलिस निरक्षक हे नविन असल्याने शहरात व परिसरात गुंडवृतीच्या व्यक्तीवर नेमकी कोणत्या कार्यवाही करण्यात आली. परवानाधारक बंदुकधारीवर नोटीसा देण्यात आल्या काय. अशी माहीती अपेक्षित असताना ती माहीती मिळु शकली नाही. यावेळी निवणुक विभागाचे नायब तहसिलदार हराळे, मिडीया प्रमुख संजय गोडबोले, मिडीया कक्ष संबधित आनिल दस्तुरकर हे हजर होते.

…….. शे.चाँदपाशा,हदगाव.

You may also like