नांदेडच्या शेख इम्रानने पटविला मराठवाडाश्री

प्रजासत्ताक दिन आणि कालवश श्याम सावंत यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कबीर क्रीडा मंडळाच्यावतीने मराठवाडाश्री शरिरसौष्ठव स्पर्धेचे नुकतेच आयोजन (26 फेब्रु) करण्यात आले होते. यात नांदेडचा शेख इम्रान हा ‘मराठवाडाश्री’चा टायटल विजेता ठरला. ‘मराठवाडाश्री’चा बेस्ट बोझर चा किताब औरंगाबाद येथील आमेर पठाण याने पटकाविला. ही स्पर्धा शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात पार पडली.

कबीर क्रीडा मंडळ, महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशन, इंडियन बॉडिबिल्डींग फेड्रेशन यांच्यावतीने ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे उदघाटन नगरसेवक बापुराव गजभारे, गंगाधरराव सोनकांबळे, विशाल गायकवाड यांच्याहस्ते झाले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून मनोजभाऊ क्षीरसागर, अमित काबरा, मुन्ना अब्बास, प्रफुल्ल सावंत, जहूर अहेमद, शेख सैफोद्दीन, फारुखभाई, राजकुमार भेदेकर आदींची उपस्थिती होती. स्पर्धेचे हे सहावे वर्ष असून साहेबराव सोनकांबळे यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. मराठवाडाश्रीचा टायटल विजेता नांदेड येथील शेख इम्रान याला 21 हजार रूपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि प्रशस्तीपत्र देण्यात आले. औरंगाबाद येथील आमेर पठाण या बेस्ट पोझर म्हणून तर बीड तालुक्यातील माजलगाव येथील माजीत बागवान याने बेस्ट मस्क्युलर किताब पटकाविला. ही स्पर्धा सर्वांसाठी खुली होती. 0 ते 55, 56 ते 60, 61 ते 65, 71 ते 75 आणि त्यावरिल वजनगटात असणार्‍या स्पर्धकांनी भाग घेतला होता. पंच म्हणून मुंबई येथील सुरेश कदम, औरंगाबादचे आरेश सिद्दीकी, परभणीहून शेख रिझवान यांनी काम पाहिले. संयोजन समितीत राजू कपाळे, सिद्धार्थ गच्चे, राजू जोंधळे, अनिल गाजुला,  राहूल घोडजकर, सोनु गजभारे आदींसह गब्बर सोनवणे आदींचा समावेश होता. शहरातील युवकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

You may also like