सर्वांच्या सहकार्यामुळे मला शिवछत्रपती पुरस्कार – जनार्धन गुपिले

क्रीडा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दाखल घेऊन महाराष्ट्र शासनाने दिलेला शिवछत्रपती पुरस्कार सर्वांच्या सहकार्यामुळे मिळाल्याचे प्रतिपादन पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले यांनी राष्ट्रमाता जिजाऊ जयंती दिनाचे औचित्य साधून फेन्सिंग असोसिएशन नांदेड सिडको येथे राज्यस्तरीय राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय खेळाडुंच्या मातांचा गौरव सोहळ्याचे आयोजन कार्यक्रमात केले.

दि १० मार्च रोजी फेन्सिंग असोसिएशन नांदेड च्या वतीने सिडको येथील वात्सल्य नगर सोसायटीतील गजानन मंदिर परिसरात क्रिडा महर्षी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त प्रा अशोक दुधारे यांच्या संकल्पनेतुन सिडको हडको परिसरातील राज्यस्तरीय राष्ट्रीय , आंतरराष्ट्रीय खेळाडुंच्या मातांचा गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उदघाटन नरेद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले तर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ अशोक कलंत्री हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून स्वारातीम विद्यापिठाचे व्यवस्थापन समितीचे डॉ दिपक बच्चेवार , क्रिडा संचालक डॉ विठ्ठलसिंघ परिहार, क्रीडा शिक्षक लाड , सिनेट सदस्य महेश मगर , डॉ मनोज पैंजने , अजय गायकवाड, सौ सिमा बोबडे , विक्रांत खेडकर, सौ वैशाली किंगरे यांची उपस्थिती होती. यावेळी पुरस्कार प्राप्त जनार्दन गुपिले यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी सत्काराला उत्तर देताना क्रीडा क्षेत्रातील तलवारबाजी प्रकारात अनेक सुवर्ण पदक विजेते यासह राज्यस्तर, विभाग व जिल्हा स्तरावर या खेळाला भरीव योगदान प्राप्त करून नावलौकिक केल्याबद्दल व सर्वांच्या सहकार्यामुळे मला हा पुरस्कार मिळाल्याचे गुपिते यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सिंधुताई तिडके यांनी तर प्रास्ताविक डॉ राहुल वाघमारे यांनी केले. यावेळी विविध क्रीडा क्षेत्रातील पुरस्कार प्राप्त खेळाडू राहुल चंदेल , संगमेश्वर शिंदे, अशपाकखान , श्रीहरी बस्ते, महेश केदार, श्रद्धा कंकाळ, कोमल गीते, गायत्री जाधव, प्रीती कोलमकर, शीतल पोहरे, कृष्णा पिंपळे, हणमंत पोले, सृष्टी कुबडे, सोनिया जमदाडे, आयुष बोरीकर, शेख इरफान पाशा यांच्यासह जवळपास ५० खेळाडूंच्या मातांचा व खेळाडूंचा स्मृतिचिन्ह व पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमास दलित मित्र गौतम गजभारे, आर जे वाघमारे, बेबीताई गुपिले, महेश गुपिले, विनोद जमदाडे, अमर बायस यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आभार प्रा डॉ रमेश नांदेडकर यांनी केले. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या खेळाडूंच्या मातांना फेटे पेहराव केल्यामुळे कार्यक्रमास शोभा आली.

…….रमेश ठाकूर, सिडको, नांदेड.

You may also like