परमेश्वर यात्रेत कलागुणदर्शन, भजन, कब्बड्डी, कुस्ती स्पर्धेची होणार धूम

गेल्या दहा दिवसापासून सुरु असलेल्या हिमायतनगर येथील श्री परमेश्वर यात्रेला रंगत चढली असून, विविध स्पर्धा सुरु आहेत, त्यामध्ये आत्तापर्यंत भाषण स्पर्धा, बडबड गीत आणि मंगळवारी रात्रीला सुदृढ ब्लॅक स्पर्धा समपन्न होणार असून, बुधवारपासून स्पर्धांची धूम चालणार आहे. दरम्यन यात्रेमध्ये ब्रेक डान्स, घडागाडी, उंच भरारी घेणारे आकाश पाळणे, बोट आदींसह विविध मनोरंजनात्मक साहित्य दाखल जाहले असून, यात्रेतील विविध दुकानांमध्ये गृहउपयोगी, सौंदर्य प्रसाधने यासह विविध वस्तूंची दुकाने सजली आहेत.

बुधवारी शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध गुणदर्शन स्पर्धा

१३ मार्च रोजी आठ ते दहा या वेळेत श्री चे मंदिर आवारात शालेय गुणदर्शन स्पर्धा आयोजित करण्यात आली पहिले बक्षीस पहिले बक्षीस ६००१/- रुपये, दुसरे बक्षीस ४००१-/ रुपये, तिसरे बक्षीस ३००१/- रूपये, चव्थे बक्षीस २००१ /- रुपये, पाचवे बक्षीस १००१/- रुपये तर सहावे बक्षीस ५०१/- रुपये प्रोत्साहन पर ३०१/- रूपये प्रत्येक शाळेसाठी सादरीकरण वेळ २० मिनिटांचा आहे. १४ मार्च रोजी महिलांसाठी सकाळी ११ ते ४ या वेळात श्री मंदिराच्या सभागृहात महिलांना करिता विविध स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेसाठी ऐनवेळी बक्षीस जाहीर करण्यात येणार आहेत.

शुक्रवारी शेतकऱ्यांसाठी पशुप्रदर्शन

१५ मार्च सकाळी ११ ते ३ या वेळेत पशुप्रदर्शन स्पर्धा होणार आहे या मध्ये गावरान बैलजोडी साठी पहिले बक्षीस ५००१ /-रुपये दुसरे बक्षीस ४००१/- रूपये तर प्रोत्साहन पर १००१/- रूपये तर लालकंधारी बैलजोडी प्रथम ४००१/- रूपये दुसरे २५०१/- रूपये प्रोत्साहन पर १००१/- रूपये तसेच लालकंधारी गाय प्रथम १५००/- रुपये दुसरे १००१/- रुपये तर लालकंधारी वळू प्रथम बक्षीस १५००/- रुपये दुसरे १००१ /-व गावरान गाय प्रथम २००१/- रुपये दुसरे १५०१/- रुपये, गावरान कालवड प्रथम १००१/- रूपये दुसरे ७००/- रुपये गावरान वळू प्रथम १५००/- रुपये दुसरे १००१/-० रुपये असे बक्षीस ठेवण्यात आले आहेत.

शनिवारी भव्य कब्बड्डी स्पर्धा

दि.१६ मार्च रोजी यात्रेतील मुख्य आकर्षण असलेली भारतीय खेळ कब्बड्डी स्पर्धा होणार असून, कब्बड्डी स्पर्धेमधेय सहभागी होणाऱ्या संघाला पहिले बक्षीस १११११ /- रूपये प्रथम पारितोषिक माजी या.माधवराव पाटील जवळगावकर यांच्यातर्फे कै.निवृत्तीराव पवार यांच्या स्मरणार्थ दिले जाणार आहे. तर दुसरे बक्षीस ७००१ /- रूपये परमेश्वर ट्रस्टकडून ४००१ /-आणि राहुल नरवाडे यांच्याकडून स्व.विजय नरवाडे यांच्या स्मरणार्थ ३००० /-रूपये, तर तिसरे बक्षीस ४००१ /- रुपये गंगाधर मामीडवार यांच्याकडून ३००० /- रुपये, आणि संजय मारावार यांच्याकडून १५०० /- रूपये देण्यात येईल.

१७ रोजी भव्य भजन स्पर्धा

यात्रेमधील सुगम संगीत तथा भजनाच्या कार्यक्रम होणार असून, हि भजन स्पर्धा दि.१७ मार्च रविवारी सायंकाळी ८ पासून होणार आहे. या स्पर्धेतील विजेत्यांना प्रथम ११ हजार १२१ रुपयाचं तर दुसरे बक्षीस ८००१ रुपये असून, तिसरे बक्षीस ६००१ /- रुपये, तर चौथे ४००१ /- रूपये, पाचवे २२२२/- रुपये, सहावे २१०० /- रुपये, सातवे १५०० /- रुपये, आठवे ११५१ /- रुपये, नववे १०००/- रुपये, दहावे ७०० /- रुपये, अकरावे ५०० /- रुपये, बारावे ३०० /- रुपये, असे भरपूर बक्षीसे ठेवण्यात आली आहेत.

१८ मार्च सोमवारी कुस्ती स्पर्धा

या यात्रेत सर्वाचे आकर्षण ठरणारी कुस्त्यांच्या कार्यक्रम हि स्पर्धा १८ मार्च सकाळी ११ वाजता पासून सुरू होणार आहे शेवटची मानाची कुस्ती ७००१ /- रूपये हे बक्षीस बजरंग दलाच्या वतीने दिले जाणार आहे. तर त्यापुर्वी २००१ /- रुपये, तिसरी कुस्ती २००१ /-रुपये, या सह व्यक्तीक कुस्त्या ही होणार आहेत. या शिवाय पैलवानाची उपस्थिती पाहून ऐनवेळी देवस्थान कमिटीच्या निर्णयाने कुस्त्या लावण्यात येतील या महाशिवरात्री महोत्सवात पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष तहसीलदार, उपाध्यक्ष महविरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, विश्र्वस्त लक्ष्मणरावजी शक्करगे, देविदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, श्यामसुंदर पवनेकर, विठ्ठलराव वानखेडे, संभाजीराव जाधव, मुलचंद पिंचा, अनंतराव देवकते, प्रकाश शिंदे, राजाराम झरेवाड, वामनराव वानखेडे, श्रीमती लताताई पाध्ये, सौ लताताई मुलंगे, माधवराव पाळजकर, श्रीमती मथुराबाई भोयर, शांतीलाल श्रीश्रीमाळ, अॅड दिलीप राठोड, अनिल मादसवार यांच्यासह यात्रा सब कमिटीचे अध्यक्ष लक्ष्मण शक्करगे, उपाध्यक्ष सुभाष शिंदे, सचिव संजय माने यांच्यासह गावकर्यांनी केले आहे.

You may also like