लोकसभेसाठी किनवट विधानसभा मतदारसंघात 2 लाख ५७ हजार ५४४ मतदार

लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या असून आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. प्रशासनाच्या वतीने निवडणूक विभाग सज्ज झाला असून १५ हिंगोली लोकसभा मतदार संघा अंतर्गत ८३ किनवट विधानसभा मतदारसंघात ३१ जानेवारी अखेर दोन लाख ५७ हजार ५४४ मतदार असल्याची माहिती किनवटचे सहायक जिल्हाधिकारी तथा सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी अभिनव गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. लोकसभा निवडणुकीच्या

किनवट न.प.घनकचरा व्यवस्थापन साईटच्या कामाच्या चौकशीची मागणी

किनवट नगर परिषद हद्दीतील घनकचरा व्यवस्थापन साईट विकसित करण्यासाठी सन्‌ 2007 मध्ये तत्कालीन नगराध्यक्ष व उपनगराध्यक्षांनी संगनमत करून नगर परिषदेच्या विकास कामांसाठी आरक्षित असलेली 46 क्रमांकाची 4 हेक्टर 88 आर ही मालमत्ता ठरवलेल्या रकमेपेक्षा अधिकचा मोबदला देऊन खरेदी केली हाेती. ही मालमत्ता अद्यापपर्यंत नगर परिषदेच्या नावावर झालेली नसतांनाही, आता या जागेवर 1 कोटी 44 लाख

किनवट तालुक्यात पोलिओचा 23088 बालकांना डोस

सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासनाच्यावतीने राबविण्यात आलेल्या पोलिओवर संपूर्ण विजय या अभियानाच्या आरंभ आ. प्रदीप नाईक यांच्या हस्ते प्रा.आरोग्य केंद्र दहेली येथे करून किनवट तालुक्यात आरोग्य विभागाच्यावतीने एकूण 284 बुथ वर 23088 बालकांना दो बूँद जिंदगी के लिये असा संदेश देत 0 ते 5 वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजण्यात आला. किनवट तालुक्याचे तालुका आरोग्य अधिकारी

साईनगर बालोद्यान कामाच्या चौकशीची मागणी

किनवट शहरात नगरोत्थानच्या निधीतून सुमारे ४८ लाख रुपये मंजूर असलेल्या, शहरातील साईनगर येथील बाल उद्यान विकसित करण्याचे काम दर्जाहीन होत आहे. उद्यानात गुत्तेदारांनी चक्क काळी माती टाकली आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे. महाराष्ट्र नगरोत्थान महानिर्माण अंतर्गत शहरातील साईनगर बाल उद्यान विकसित करणे, संरक्षक भिंतीची उंची वाढवणे, अंतर्गत रस्ते

किनवट तालुक्यात गेल्या 9 वर्षात 168 शेतकऱ्यांनी संपविली जीवनयात्रा

शेतातील सततची नापिकी, दुष्काळी स्थिती, वाढती महागाई, कर्जबाजारीपणा व कुटुंबाला पोसतांना आलेली हतबलता यामुळे किनवट तालुक्यात गेल्या 9 वर्षात तब्बल 168 शेतकऱ्यांनी आपली जीवनयात्रा संपविली आहे. आतापर्यंत त्यातील 113 पात्र कुटुंबाना शासनाची मदत मिळाली असून, 54 आत्महत्या केलेले शेतकरी अनुदानास अपात्र ठरले आहेत; तर गेल्या महिन्यातील एक प्रकरण चौकशीसाठी प्रलंबित असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. सर्वाधिक

किनवटच्या सरस्वती विद्यामंदिरमध्ये मागासवर्गीयांचा अनुशेष डावलून नियुक्ती

संस्थाचालक, शिक्षणाधिकारी मडावी आणि शिक्षक अफरोज खान विरुध्द गुन्हा दाखल सन 2013 मध्ये किनवट येथील एका शाळेत मागासवर्गीय यांचा अनुषेश डावलून खुल्या प्रवर्गातील उमेदवाराला नियुक्ती देण्याचा प्रताप करणाऱ्या तत्कालीन शिक्षणाधिकाऱ्यांसह पाच जणांविरुध्द शासनाची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. सध्याचे उपशिक्षणाधिकारी डी.डी.शिरसाट यांनी वजिराबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार दि.7 सप्टेंबर 2013 आणि त्यांच्यापुर्वी किनवट येथील

किनवट नगर परिषदेचा शिलकी अर्थसंकल्प

किनवट नगर परिषदेचा सन् 2019-20 या वर्षासाठीचा शिलकी अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला आहे. गेल्यावर्षीची शिल्लक, संभाव्य अनुदान व करापोटी जमा होणारी रक्कम आदी गोष्टींसह साधारणत: 90 कोटी रुपयांच्या या अर्थसंकल्पात एकूण जमा रक्कम 89 कोटी 06 लक्ष 45 हजार रुपये दर्शविली आहे, तर एकूण खर्च 89 कोटी 01 लक्ष 30 हजार दर्शविण्यात आलेला आहे. अर्थसंकल्पात

जंगलातील रोही औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत

किनवट तालुक्यातील मौजे दिगडी ( मंगाबोडी ) ते कोठारी ( चिखली ) पर्यंत पसरलेल्या जंगलातून गोकुंदा येथील निजामकालीन तलावात पाण्यासाठी आलेल्या जंगली रोहीच्या पाठीमागे गावठी कुत्र्याचा कळप लागल्याने, तो संरक्षक भिंतीवरून उडी मारून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) आला. सध्या येथे स्थलांतरीत तहसिल कार्यालय सुरू असल्याने रोहीच्या अवतीभवती बघ्यांची गर्दी जमली होती. भ्रमणध्वनी संदेश पोहोचताच सहायक

पोलीस उपअधीक्षक मंदार नाईक किनवट येथे रुजू

बीड जिल्ह्यातील आष्टी येथून बदली झालेले पोलीस उपअधीक्षक मंदार नाईक हे किनवट येथे रुजू झाले असून, शनिवारी (दि.२३) नाईक यांनी येथील पदभार स्वीकारला आहे. यापूर्वीचे पोलीस उपअधीक्षक सदाशिव चौधरी हे दि.३१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त झाले. त्यामुळे रिक्त असलेल्या जागी बीड जिल्ह्याच्या आष्टी येथे सेवारत असलेले मंदार नाईक यांची येथे नियुक्ती करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर

किनवट येथे छत्रपतींच्या जयघोषाने दुमदुमला आसमंत

मृत्तिकेचे पावित्र्य तव राखिले, स्वराज्य स्वप्न तव साकारिले, गर्जुनिया केलासी हिंदोत्सव साजरा, शिवराजा करितो तुज मानाचा मुजरा..! या ओतप्रोत भावनेने यशवंत, किर्तीवंत, सामर्थ्यवंत, वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत अशा जाणत्या राजाची अर्थात अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्रीमंतयोगी, छत्रपती शिवाजी महाराजांचा 389 वा जन्मोत्सव आज मंगळवारी (दि.19) किनवट शहरासह तालुक्यात अत्यंत उत्साहाने साजरा करण्यात आला. शिवप्रेमींच्या उत्साहाला आनंदाचे