विज्ञानाच्या दृष्टीला विवेकाची जोड द्या – डॉ.श्रीपाल सबनीस

एकूणच मानव जातीला आणि विशेषतः बालमनाला प्रिय असलेला देवतास्वरूप चांदोमामा आधुनिक काळातील विज्ञानाच्या प्रगतीमुळे माणसाच्या पायाखाली आला आहे. आजच्या ज्ञान- विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या गतिमान प्रगतीमुळे चंद्र-तारे, ग्रह-वारे इत्यादी ज्या काही नवलपूर्ण गोष्टी होत्या; त्यात आता कुठलीही नवलाई राहिली नाही. वैज्ञानिकांच्या अथक प्रयत्नांमुळे भूगर्भापासून खगोलापर्यंतच्या अनेक क्षेत्रांत अपूर्व असा शोध लागला आहे. उत्तरोत्तर लागत आहे. अनुशक्तीपासून