वंचित बहुजन आघाडी मारणार बाजी की कॉंग्रेससह आघाडीतही पसरणार नाराजी

भारतामध्ये सतराव्या लोकसभेसाठी नुकत्याच निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या. पण गेल्या ७-८ महिण्यांपासून प्रत्येक राजकीय पक्ष व काही संघटना आपापल्या पद्धतीने राजकीय मनसुबे तयार करुन निवडणुका लढविण्यासाठी तयार झाल्या आहेत. महाराष्ट्राच्या पातळीवर शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष सत्तेत असताना एकमेकांच्या विरुद्ध वागत होते. भाजपने घेतलेल्या कोणत्याही निर्णयाच्या विरुद्ध शिवसेना आपले विचार मांडत होती. ऑक्टोंबर महिन्यापासून