वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी शिवसेनेचे सचिन नाईक

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप-सेनेने राज्यातील विविध महामंडळाच्या पदांवर नियुक्त्या केल्या असून, किनवट येथील शिवसेनेचे युवानेते सचिन नाईक यांची वसंतराव नाईक आर्थिक विकास महामंडळाच्या सदस्यपदी नियुक्ती केल्याचे शिवसेनेने जाहीर केले आहे. सचिन नाईक यांच्या नियुक्तीबद्दल किनवट-माहूर तालुक्यातील शिवसैनिकांसह बंजारा समाजाने आनंद व्यक्त केला असून, सचिन नाईक यांची महामंडळावरील नियुक्ती म्हणजे आगामी किनवट विधानसभेची उमेदवारी असल्याची चर्चा