परमेश्वर मंदिराचे रूप पालटण्यासाठी भविष्यकाळात निश्चितपणे प्रयत्न करणार – मा. आ. माधवराव पाटील जवळगावकर

” शिवपर्व २०१९” विशेषांकाचे जवळगावकरांच्या हस्ते शानदार प्रकाशन

हिमायतनगर तालुका माझा मी हिमायतनगर तालुक्याचा आहे, तालुक्याच्या वैकासाच्या बाबतीत आणि विशेषतःतीर्थक्षेत्र श्री परमेश्वर मंदिराच्या विकासासाठी आपल्या सर्व जनतेच्या आशीर्वादाने मी प्रयत्न केले. त्यामुळे ५ ते ७ वर्षांपूर्वीचा मंदिर परिसर आणि आजचा मंदिर परिसर यामध्ये जमीन आसमांनचा विकासात्मक फरक दिसून येत आहे. नवसाला पावणारा श्री परमेश्वर व जनतेचा आशीर्वाद राहिला तर याहीपुढे माझ्या परीने मंदिराचे रूप पालटण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करिन असे प्रतिपादन परमेश्वर मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून देणारे तथा हदगाव – हिमायतनगर तालुक्याचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी केले.

ते महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त वाढोणा / वारणावती (हिमायतनगर) येथील जाज्वल्य देवस्थान श्री परमेश्वर मंदिराच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर आणि नांदेड न्युज लाईव्ह या बेबपोर्टलच्या सातव्या वर्धापन निमित्ताने ” शिवपर्व २०१९” या विशेषांकाच्या प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. यावेळी मंचावर काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष विकास पाटील, प्रथम नगराध्यक्ष आ.अखिल आ.हमीद, मुख्यध्यापक गजानन सूर्यवंशी, रामराव सूर्यवंशी, सुभाष शिंदे, परमेश्वर काकडे, अनिल पवार, आहद भाई, मंदिर कमिटीचे सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, जेष्ठ नागरिक लक्ष्मण शक्करगे, शांतीलाल सेठ, राजाराम बलपेलवाड, अनंतराव देवकते, विठ्ठलराव वानखेडे, माधव पाळजकर, देवीदास मुधोळकर, प्रकाश कोमावार, संभाजी जाधव, प्रकाश शिंदे, वामन बनसोडे, श्रीमती लताबाई पाध्ये, सौ.लताबाई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर, एड.दिलीप राठोड, संजय माने, उदय देशपांडे, बुलढाणा अर्बन बैंकचे शाखाधिकारी उदय चौधरी, जेष्ठ पत्रकार प्रकाश जैन, गोविंद गोडसेलवार, साईनाथ धोबे, सोपान बोम्पीलवार, दिलीप शिंदे, परमेश्वर शिंदे, आदींसह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना जवळगावकर म्हणाले कि, दरवर्षी हिमायतनगर येथे भरविण्यात येणाऱ्या श्री परमेश्वर यात्रेसाठी परराज्यातूनही मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. गेल्या अनेक वर्षांची परंपरा लाभलेल्या या देवस्थानची महती दूरवर पसरली असून, लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी गर्दी करत आहेत. मंदिराच्या विकासकामासाठी ट्रस्ट मंडळींचे मोठे योगदान असून, इतिहास कालीन वारसा लाभलेल्या श्री परमेश्वर मंदिराची भक्तांना माहिती व्हावी या उद्देशाने नांदेड न्युज लाईव्हचे संपादक अनिल मादसवार यांनी व त्यांची टीम गेल्या ५ ते ६ वर्षांपासून विशेषांकाच्या माध्यमातून भक्तांपर्यंत श्रीची इतिहासकालीन माहिती पोचविता आहेत. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही ” शिवपर्व २०१९ ” या विशेषांकाची दर्जेदार अशी मांडणी करून निर्मिती करण्यात आली आहे. या अंकासाठी परिश्रम घेणाऱ्या अनिल मादसवार व सर्व पत्रकारांच्या टीमचे मनापासून अभिनंदन करून सर्व भाविक भक्तांना महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या.

तत्पूर्वी जवळगावकर यांनी श्री परमेश्वराचे दर्शन घेऊन, प्रसाद वितरण केले. त्यानंतर बजरंग दलाच्या वतीने वितरित केल्या जाणाऱ्या दुधाचा स्वाद घेऊन युवकांच्या कार्याची प्रशंसा केली. मंदिर कमिटीच्या कमिटीच्या वतीने शांतीलाल श्रीश्रीमाळ आणि पत्रकारांच्या वतीने दैनिक पुढारीचे तालुका प्रतिनिधी गोविंद गोडसेलवार यांनी माधवराव पाटील जवळगावर यांचा सत्कार केला. विशेषांकाच्या प्रकाशनानंतर दर्शनासाठी आलेल्या भक्तासाठी सदरचे विशेषांक मोफत भेट देण्यासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी विजय सूर्यवंशी, परमेश्वर पानपट्टे, बाबुराव भोयर गुरुजी, परमेश्वर उत्तरवार, दत्ता काळे, पवार सर, विठ्ठल ऐरणकर, गोविंद बंडेवार, प्रभाकर पळशीकर, सुधाकर चव्हाण, हनुसिंग ठाकूर, परमेश्वर शिंदे, पापा पार्डीकर, सचिन माने, शे.मुखीद खडकीकर, वैभव शिंदे, गजानन गायके, पंडित ढोणे, विष्णू जाधव, माधव यमजलवाड, उत्कर्ष मादसवार, आदीसह अनेक दर्शनार्थी भक्त व नागरिकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुरेख असे सूत्रसंचालन व आभार गोविंद शिंदे यांनी मानले.You may also like