शोभायात्रा व काल्याच्या कीर्तनाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता….।

जिल्हा परिषद अध्यक्षा शांताबाई जवळगावकर दिंडीत सामील 

मागील आठ दिवसापासुन सुरु असलेल्या अखंड हरिणाम सप्ताह व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळयाची सांगता दि. ०९ मार्च शनिवारी ग्रामदिंडी व हभप. रविदास महाराज चव्हाण यांच्या मधुर वाणीतील काल्याच्या किर्तनाने करण्यात आली. याप्रसंगी ग्रामीण व शहरी भागातुन हजारोंच्यावर श्री परमेश्वर भक्तांचा जनसागर लोटला होता.

ग्रंथराज पारायण शेवटच्या दिवशी रात्रीला दीपोत्सव साजरा करण्यात आला, यावेळी संपुर्ण मंदिर परिसर दिव्यांच्या ज्योतीने उजळुन निघाला होता. अखंड हरिणाम सप्ताह समाप्ती नीमीत्त दि०९ शनिवारी सकाळी १० वाजता ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाची पालखी दिंडी व्यासपीठाचार्य हभप परमेश्वर महाराज डोल्हारीकर यांच्या नेतृत्वाखील शहरातील मुख्य रस्त्यावरुन काढण्यात आली. या शोभा यात्रेत महीलां, मुलीं डोक्यावर ज्ञानेश्वरी ग्रंथ व तुलसी वृंदावण घेऊन सामील झाल्या होत्या.  दरम्यान नांदेड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती शांताबाई पवार यांनी हाती टाळ घेऊन भजनी मंडळींसह ढोल तश्याच्या गजरात काढण्यात आलेल्या दिंडीत सामील झाल्या होत्या. तत्पूर्वी त्यांनी अलंकारमय श्री परमेश्वर मूर्तीचे दर्शन घेतेले. त्यानंतर भजनी मंडळाच्या वारकरी महीला व पुरुषांनी ताल धरुन शहरवासीयांना आकर्षीत करत शहरातील मुख्य रस्त्याने भव्य शोभा यात्रा काढली होती. शहरातील मुख्य रस्त्यावरून निघालेली शोभा यात्रा परत श्री पमेश्वर मंदिरात येऊन सत्कार समारंभ व महाप्रसादाने ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायणाचा समारोप करण्यात आला.

त्यानंतर सुरु झालेल्या काल्याच्या कीर्तनात जवळपास ३ तास हभप. रविदास महाराज चव्हाण यांनी उपस्थित भक्तांना सखोल असे मार्गदर्शन हरिकीर्तनातून केले. सायंकाळी ५ वाजता काल्याच्या किर्तनानंतर राधा -कृष्णाची झाकी साकारलेल्या बालकांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली. काल्याच्या प्रसाद वितरणानंतर दहीहंडी फोडलेल्या राधाकृष्णीची मीरवणुक शहरातील मुख्य रस्त्यावरुन बैंडबाज्याच्या गजरात काढण्यात आली. यावेळी परमेश्वर मंदिराचे उपाध्यक्ष महावीरसेठ श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी राजेश्वर चिंतावार, लक्ष्मण शक्करगे, विठलराव वानखेडे, अनंता देवकते, प्रकाश शींदे, प्रकाश कोमावार, राजाराम बलपेलवाड, माधवराव पाळजकर, संभाजी जाधव, लताबाई पाध्ये, लताबाई मुलंगे, मथुराबाई भोयर, वामनराव बनसोडे, शांतीलाल सेठ, एड. दिलीप राठोड, अनिल मादसवार, यात्रा सब कमेटीचे उपाध्यक्ष सुभाष शींदे, सचीव संजय माने, रामराव सुर्यवंशी, राजु गाजेवार, शंकराप्पा पळशीकर, विजय शिंदे, विलास वानखेडे, सुधाकर चव्हाण, दिलीप लोहरेकर, उदय देशपांडे, राम नरवाडे, परमेश्वर उत्तरवार, कल्याण ठाकूर, बंडू अनगुलवार, सचिन माने, बाळू मारुडवाऱ, परमेश्वर गोपतवाड, प्रकाश जैन, साईनाथ धोबे, अनिल भोरे, सोपान बोम्पीलवार, विठ्ठल ठाकरे, हनूसीग ठाकूर, मन्नान भाई, गजानन चायल, ज्योतीताई हरडपकर, ज्योती बेदरकर, रुघे बाई, शिवाजी रामदिनवार, मारोती वाघमारे, बंडू हरडपकर यांच्यासह बजरंग दलाचे युवक स्वयंसेवक व गावकरी नागरीक महीला – पुरुष हजारोच्या संख्येने उपस्थीत होते.

पोलिसांचे ढिसाळ नियोजन

श्री परमेश्वर यात्रेत अलंकारमय श्रीची मूर्ती असून, शनिवारी काल्याच्या कीर्तनाच्या दिवशी हजारोच्या जनसमुदाय जमलेला असताना येथे नेमण्यात आलेल्या पोलीस कर्मचारी आपली ड्युटी करण्याचे सोडून एका रूममध्ये बसून कर्तव्याकडे कसून केल्याचे निदर्शनास आले आहे. पोलीस कर्मचाऱयांच्या ढिसाळपणामुळे कीर्तन सुटताच झालेल्या गर्दीला सांभाळताना मंदिर व्यवस्थापन समितीच्या स्वयंसेवकांची दमछाक झाली. अनेकदा पोलीस कर्मचाऱ्यांनी गर्दीला शिस्त लावण्याचे माईकवरून सांगूनही वेळेवर कर्मचारी ड्युटीवर दिसले नसल्याने गर्दी कमी होताच पोलीस कर्मचाऱ्यांनी हजेरी लावल्याबद्दल अनेकांनी नाराजी व्यक्त केली. यानंतर यात्रेमध्ये विविध धार्मिक, सांस्कृतिक, कबड्डी, कुस्ती यासह विविध स्पर्धा होणार आहेत. किमान या पुढील कार्यक्रमाच्या वेळीतरी पोलिसांनी आपल्ये कर्तव्य निष्ठेने पार पडून कार्यक्रमामध्ये अडचण निर्माण होऊ नाही याची काळजी घ्यावी असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.

You may also like