हिमायतनगर बीजेपी तालुकाध्यक्षपदी आशिष सकवांन

येथील भाजप तालुकाध्यक्ष पदासाठी बंजारा समाजाचे धडाडीचे नेतृत्व तथा बूथ कमिट्या स्थापन करण्यात अव्वल स्थान मिळविणारे आशिषभाऊ बाबुराव सकवांन यांची जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकरांनी हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी वर्णी लावल्याबद्दल तालुक्यात फटाक्याची आतिषबाजी करून जल्लोष करण्यात आला आहे.

मागील लोकसभा निवडणुकीनंतर हिमायतनगर तालुक्यात भाजपच्या संघटन वाढीला सुरुवात झाली असून, माजी खा.सुभाष वानखेडे यांच्या अनेतृत्वखाली विधानसभा मतदार संघात अनेक ठिकाणी भाजपच्या पक्ष स्थापन करण्यात आल्या होत्या. दरम्यान भाजप तालुकाध्यक्षपदी विजय नरवाडे यांनी निवड झाल्यानंतर अनेक युवक भाजपमध्ये सामील झाले. एक- एक करत बहुतांश शिवसैनिकांनी भाजपात प्रवेश केला, दरम्यान काळाने घाला केला आणि विजय नरवाडे यांचं अपघाती निधन झाले. त्यांच्या जाण्याने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली होती. हि पोकळी भरून काढण्यासाठी आणि आगामी २०१९ च्या लोकसभा – विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन जिल्हाध्यक्ष राम पाटील रातोळीकरांनी नांदेड जिल्ह्यातील रिक्त जागा भरत भारतीय जनता पार्टीला उभारी देण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये अनेक जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय नेमणूक केल्या असून, हिमायतनगर तालुक्याला दोन पदे बहाल झाली आहेत. यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती सुधाकर पाटील यांची जिल्हा सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली असून, युवकांसह तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी आशिष बाबुराव सकवान याना देऊन भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्षपद बहाल केले.

आशिष सकवान यांची तालुकाध्यक्षपदी वर्णी लावल्यामुळे हिमायतनगर तालुक्यातील भाजपमध्ये कार्यरत असलेल्या युवकांमध्ये जल्लोष निर्माण झाला असून, फटक्याची आतिषबाजी करून आशिष भाऊ तुम आगे बढो…. हम तुम्हारे साथ है… चा नारा देत पुष्पहार, पेढा भरून शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तसेच परमेश्वर मंदिर ते त्यांच्या निवासस्थानापर्यंत पदयात्रा काढली. यावेळी बाबुराव बोड्डेवार, रामभाऊ सूर्यवंशी, भाऊ देवकते, खंडू चव्हाण, गोविंद शिंदे, गजानन हरडपकर, बंडू अनगुलवार, अनिल नाईक, राम नरवाडे, हिदायत खान, मधुकर पांचाळ, सचिन नरवाडे, योगेश गुंडेवार, रामदास रामदिनवार, संजय सूर्यवंशी, हनुसिंग ठाकूर, विशाल मादसवार, दीपक सोनसाळे, राजू चलमेलवार, सचिन कोमावार, पवन करेवाड, गौरव सूर्यवंशी, सौ.लताताई मुलंगे, संतोष गाजेवार, अमोल पेन्शनवार, संजय ढोणे, साईनाथ कोमावार, मंगेश शिंदे, धम्मपालवार, देवसरकर, राजू अरबड, सुरज दासेवार, सुमित कागणे, विलास ढोणे, संतोष कदम डोल्हारीकर, दुर्गेश मंडोजवार, प्रकाश सेवनकर, अनिल मादसवार, अनिल भोरे, साईनाथ धोबे, जांबुवंत मिराशे, दिलीप शिंदे, परमेश्वर शिंदे, आदींसह अनेकांनी उपस्थित होऊन आशिष साकवांन याना निवडीबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.        

You may also like