महीला दिनानिमित्त शहीद जवानांच्या विर – वधुना महिलांनी केला सलाम

हदगाव शहरात शहिदांना वाहिली आदरांजली

हदगाव शहरात जागतिक महीला दिना निमित्तानं पुलवामा येथे दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या विर जवानांना आदरांजली वाहत व शहीदाच्या विर – वधुना हदगाव शहराच्या महीला द्वरे सलाम करत ७१ वर्ष स्वतंत्र अधिक ४४ जवान असे मिळून ११५ मीटर तिरंगा ध्वज घेवुन रँली काढली होती. या रैलीमध्ये महीलानी बहुसंख्याने सहभागा नोदविला होता.

या आकर्षक रँलीचे आयोजन सौ.राऊळ मँडम यानी केल होत. सदर रँली शहरातील जानकीलाल राठी चौका पासुन काढण्यात आली होती. ती शहरात मुख्य रस्यावर या तिरंगा रँलीचे फुलाद्वरे स्वागत करण्यात आले होते. भारत माता की जय या महीलाच्या जयघोषणांनी शहर दुमदुमले होते. प्रथमच अश्या रँली मध्ये महीलानी विशेष सहभाग घेतल्याने रँलीला विशेष महत्त्व प्राप्त झाले होते. एक प्रकारे महीलांच्या शक्तीचे प्रथमच प्रदर्शन हदगाव शहर वासीयाना दिसुन आले. राउळ मँडम यांच्या संकल्पनाची अनेक महीलाँनी कौतुक केले व देशप्रेमी विषयी जोश निर्माण केल्याच अनेक महीलांनी आपले मनोगत व्यक्त करताना सागितल. ही रँली यशस्वी करण्यासाठी झेंडा ग्रुप मधिल प्रामुख्याने शरयु मनाठकर, निलमा बलदवा, जयश्री मुंदडा, राधिका तुप्तेवार, बशारत बेगम, दिपा गँधेवार, निशा लाहोटी, आशु वलमटकर, मुक्कावार, भारती बलदवा, दीप बलदवा, निधी इंगळे, धनश्री दमकोंडवार, सपना कौटिकवार, अश्विनी शहाणे, आरती बलदवा, स्वरंजली महाजन, आदीसह अनेक महीलाँनी रँली यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. सदर रैली शांततेत पार पडावी यासाठी हदगाव पोलिसानी चोख बदोबस्त लावून सहकार्य केले.

……….शे. चांदपाशा, हदगाव.

You may also like