श्री परमेश्वर यात्रेतील सांस्कृतिक कार्यक्रम देशभक्तीपर गीतांनी गाजला

घारापुर शाळेने जिंकला सलग दुसऱ्या वर्षीही अव्वल क्रमांक

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर येथील श्री परमेश्वरच्या महाशीवरात्री यात्रेला रंगत चढली असून, शालेय स्पर्धेने उत्सव गाजत असून, नुकत्याच शाहिद झालेल्या पुलवामा हल्ल्याचा निषेध स्पर्धेत सामील झालेल्या प्रत्येक शालेय विद्यार्थाच्या कलागुणांमधून स्पष्टपणे जाणवला असून, विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या कलागुणांच्या सादरीकरणास वीर जवान अमर रहे…. अमर रहे अमर रहेचे नारे देऊन प्रेक्षकांनी प्रतिसाद दिल्याने मंदिर परिसरात दणाणून निघाला होता.

दि.१३ मार्च बुधवारी रात्री संपन्न झालेल्या परमेश्वर यात्रेतील शालेय विविध कला गुणदर्शन कार्यक्रमात तालुक्यातील ११ शाळांनी सहभाग घेऊन कला – गुणांचा अविष्कार सादर केला. यात घारापुर येथील जिल्हा परीषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांच्या माध्यमातुन जय बजरंग….बोला जय हनुमान…. उदे ग आंबे उदे… माझ्या ढवळ्यान पवळ्याची जोडी जीवाहुनही प्यारी … आम्ही जातीचे शेतकरी खातो कष्टाची भाकरी.. हे गीत सादर करून उपस्थीतांना मंत्रमुग्ध केले. या शाळेतील विदयार्थ्यांच्या सादरीकरणाला प्रथम क्रमांकाचे ६००१ रुपयाचे बक्षीस मंदिर संस्थाचे संचालक मंडळीं व पदाधीका-यांच्या हस्ते देऊन गौरवीण्यात आले. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरुवात श्री परमेश्वराच्या प्रतिमेचे पूजन करून पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आली. कार्यक्रमाचं सुरुवातील तालुक्यातील शाळांमधून प्रथम, द्वितीय, तिरुतीय क्रमांक मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

तर हिमायतनगर येथील हिमायतनगरच्या गुरुकुल इंग्लिश स्कुलच्या चिमुकल्यांनी सादर केलेल्या गजर माउलीचा या गीतावर वारकऱ्यांसह श्री विठ्ठलाचे दर्शन घडविणारे गीत कला- अविष्कार सादर करुन प्रेक्षकांची दाद मिळवीली. या शाळेस व्दितीय क्रमांकाचे ४००१ रुपयाचे पारीतोषीक शालेय स्पर्धा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष एन.के.अक्कलवाड, घुंगरे, वऱ्हाडे यांच्यासह उपस्थित मंदिर कमेटी संचालकांच्या हस्ते देण्यात आले. सायप्रस इंग्लिश स्कुल या शाळेतील चिमुकल्यांच्या सादर केलेल्या कुर्या चालल्या रानात…सुरु झाली या पेरणं….यासह इतर गाणे सादर करणाऱ्या चिमुकल्यांना तृतीय क्रमांकाचे ३००१ रुपयाचे बक्षीस समीतीचे सदस्य अनंता देवकते, सौ.लताताई मुलंगे, श्रीमती मथुराबाई भोयर यांच्या हस्ते देण्यात आले. तर चौथ्या क्रमांकाचे २००१ रुपयाचे बक्षीस तालुक्यातील सिरंजनी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या गीतांना पाचव्या क्रमांकाचे १००१ रुपयाचं बक्षीस हुतात्मा जयवंतराव पाटील शाळेला, सहावे प्रोत्साहनपर बक्षीस नृसिंह इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपर गीतास देण्यात आले.

या स्पर्धेत चिमुकल्या बालकांनी…. आय लव्ह माय इंडिया…, मुझे माफ करणा ओम साई राम…., वंदे मातरंम…. वंदे मातरंम…., हर हर महादेव…, जाग रे शिवशंकरा तू जाग रे…, संदेसे आते है…., रंग सच्चाई का…., लल्लाटी भंडार…., मुजरा मानाचा.. मानाचा.. जिजाईला…., चांद ने पुच्छ तारो सें…., बेटी बचाव…., यासह विवीध देशभक्तीपर गीते सादर करुन चिमुकल्या बालकांनी उपस्थीतांची मने जिंकली. या सांस्कृतीक कार्यक्रमात नागार्जुन इंग्लिश स्कुल इंदिरा नगर, सायप्रस इंग्लिश स्कुल दीप नगर खडकी, शिवाजी विद्यालय चातारी, जि.प.केंद्रीय कन्या शाळा हिमायतनगर, जी.प.शाळा घारापुर, सिरंजनी, वडगाव ज., विरसनी, नृसिंह इंग्लिश स्कुल हिमायतनगर, हुजपा मुलींची शाळामी गुरुकुल इंग्लिश स्कुल, एकलव्य स्टडी सर्कल आदीं शाळेच्या चिमुकल्यानी सहभाग घेतला होता.

यावेळी संबंधित शाळेच मुख्याध्यापक, शिक्षक- शिक्षीका, शालेय मुला-मुलींसह त्यांचे पालक, परमेश्वर मंदिर ट्रस्टचे मंदिराच्या सदस्या सौ.लताबाई मुलंगे व श्रीमती मथुराबाई भोयर, आनंता देवकते, माधव पाळजकर, एड.दिलीप राठोड, अनिल मादसवार, यात्रा समीतीचे उपाध्यक्ष सुभाष शिंदे, सचिव संजय माने, अक्कलवाड सर, रायेवार सर, राम नरवाडे, परमेश्वर पानपट्टे, दिलीप राठोड, अशोक अनगुलवार, शिंदे सर, संजय मारावार, राम सूर्यवंशी, गोविंद शिंदे, सचिन माने, विकास नरवाडे, बाबुराव भोयर, प्रकाश साभळकर, मारोती वाघमारे, सचिन मांगुळकर आदींसह मंदिर समिती, यात्रा समिती सदस्य, नागरीक हजारोंच्या संख्येने उपस्थीत होते. या स्पर्धा शांततेत पार पाडण्यासाठी हिमायतनगर ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र बोरसे यांचे कर्मचारी सपोनि ज्ञानोबा काळे, बालाजी लक्षटवार व महिला -पुरुष कर्मचाऱ्यांनी सुरक्षेसाठी बंदोबस्त ठेवला होता.

You may also like